कल्याण :- ( शंकर जाधव ) कल्याण आधारवाडी जेलरोड व चिकणघर परिसरातुन दोन साडेचार फुटी लांबीचे साप सर्पमित्र दत्ता बोंबे यांनी पकडले. वातावरणात आलेल्या गारव्यामुळे पाणथळ जागेतील सापाचे खाद्यासाठी नागरीवस्त्या मध्ये आढळण्याचे प्रमाण वाढले आहे. बुधवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास सर्पमित्र दत्ता बोंबे यांना डाँन् बास्को शाळेतील जगताप सुरक्षारक्षक यांचा आधारवाडी जेल रोड डाँन् बास्को शाळेजवळील रस्त्याच्या डिव्हाईडर मधील गँप् मध्ये साप असल्याचा कॉल आला. तातडीने दत्ता बोंबे यांनी घटनास्थळी धाव घेत डिव्हाईडर मधील गँप् मधुन सापाला बाहेर काढुन पकडले असता साडेचार फुट लांब तो दिवड जातीचा बिनविषारी पाणसाप होता. तर दुसऱ्या घटनेत चिकणघर येथील बाळाराम भोईर चाळीतील विजयानंद बुगडे यांच्या वर्हाड्यातील टेबलखाली अडगळीत असलेल्या सापाला दत्ता बोंबे यांनी पकडल्या नंतर तो पाणसाप असल्याचे समजताच उपस्थितीनी सुटकेचा निश्वास टाकला. तर दुपारच्या सुमारास डपिंग ग्राँऊन्ड परिसरातील वणिज्य वापर असलेल्या इमारती जवळुन एक धामण बोंबे यांनी पकडुन तिघा ही सापांना जंगलात सोडले
कल्याणात एकाच दिवशी तीन साप पकडले…
July 18, 2019
119 Views
1 Min Read

-
Share This!