ठाणे

डोंबिवलीत मनसे नगरसेवकाने केला `स्मार्ट रस्ता`..अंतर्गत सेवा वाहिन्यांचे उत्तम व्यवस्थापन असलेला एकमेव कॉन्क्रीटीकरणाचा रस्ता…

 डोंबिवली :- ( शंकर जाधव  ) रस्ता म्हंटला कि खड्डे असे समीकरण सर्व राज्यातील शहरात दिसून येते. मात्र डोंबिवली शहर हे याला अपवाद ठरणार आहे.मनसे नगरसेवक मंदार हळबे यांनी आपल्या स्मार्ट कामाचा पुरावा देत त्याच्या प्रभागात बनवलेल्या स्मार्ट रस्त्याचे डोंबिवलीकर कौतुक करत आहेत. चिपळूणकर पथावरील आनंद बालभवन ते श्री स्नेह सोसायटी असा ५०० मीटरचा हा प्रॉपटी चेंबर फॉर वाॅटर कनेक्शन`या योजनेंतर्गत अंतर्गत सेवा वाहिन्यांचे उत्तम व्यवस्थापन असलेला एकमेव कॉन्क्रीटीकरणाचा रस्ता बनवण्यात आला आहे. गुरुपौर्णिमी निमित्त या रस्त्याचा लोकापर्ण सोहळा पार पडला.

२ रा टप्पातील चिपळूणकर पथावरील आनंद बालभवन ते श्री स्नेह सोसायटी असा ५०० मीटरचे काम दोन महिने काम सुरु होते. गुरुपोर्णिमेनिमित्त ज्येष्ठ नागरिक श अशोक वामन जोशी यांच्या हस्ते सदर रस्त्याचा लोकापर्ण सोहळा पार पडला. सदर प्रसंगी माजी नगरसेविका कोमल पाटील प्रभागातील रहीवासी आठवले, हिंगणे, पुसाळकर, संजय जोशी,  संजय कानिटकर, कुलकर्णी,  डोंबिवली वाहतूक पोलिस निरीक्षक एस. एन.जाधव, उप-अभियंता रोहिणी लोकरे, विभाग अध्यक्ष रमेश यादव,  उपविभागाध्यक्ष विशाल बढे, शाखा अध्यक्ष प्रकाश थोरात व प्रभागातील नागरीक उपस्थित होते. पाणी पुरवठा करणारी वाहिनी, केबल, वीजवाहिनी, टेलीफोन वाहिनी,ऑपटीकल फायबर इत्यादी वाहिन्यांच्या दुरुस्तीसाठी रस्त्यांचे खोदकाम करावे लागते. या कामांमुळे रस्त्यात खड्डे पडत असल्याने परिणामी प्रशासन आणि लोकप्रतिनिधीना नागरिकांची नाराजी सहन करावी लागते.मनसे नगरसेवक मंदार हळबे यावर तोडगा काढत सदर रस्ता बनवताना `प्रॉपटी चेंबर फॉर वाॅटर कनेक्शन`या योजनेंतर्गत सेवा वाहिन्यांची चोख व्यवस्थापन करण्यात आले आहे.त्यामुळे वीज, पाणी इत्यादी मुलभूत सुविधा इतर सोयीसुविधा प्रभागातील अखंडीतपणे मिळणर आहेत. कल्याण-डोंबिवलीतील हा पहिला प्रभाग आहे जे रस्त्याचे काँक्रीटीकरण करताना रस्ता खोदून सेवा वाहिन्या रस्त्याच्या कडेला टाकण्यात आल्या आहेत.या रस्त्यासाठी पालिकेच्या ८० लाख रुपये निधीतून बनवण्यात आला आहेत, अश्या प्रकारचे रस्ते यापूर्वीच बनवण्यात आले असते मात्र पालिकेचे तत्कालीन शहर अभियंता प्रमोद कुलकर्णी यांनी आडकाठी घातली असे मनसे नगरसेवक मंदार हळबे यांनी सांगितले.


`प्रॉपटी चेंबर फॉर वाॅटर कनेक्शन`या योजनेंतर्गत सेवा वाहिन्यांची व्यवस्थापन असलेल्या या रस्त्यामुळे कोणतीही गळती न होता पाणी पुरवठा सुरळीत पाणी पुरवठ्याचे प्रमाण वाढत आहे.तसेच प्रभागातील वीज समस्येचे निराकरणहि लवकर होते.यापुढे खड्डे पडणार नसल्याने वाहतूक विनासायास सुरु राहणार असल्याचे मनसे नगरसेवक मंदार हळबे यांनी सांगितले.


 

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

नवी मुंबई

error: Content is protected !!