कल्याण : मुंबई विद्यापिठाच्या कल्याण येथील उपकेंद्राचे उद्घाटन शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या हस्ते नुकतेच संपन्न झाले. या केंद्राचे १२ वर्षाने उद्घाटन केले असून या कार्यक्रमाला राजकीय नेत्यांना बोलवल्याने अभाविपच्या मुलांनी आंदोलन केले होते. मात्र हे १२ वर्षांनी सुरू केलेल्या या उपकेंद्रात केवळ अभियांत्रिकी शिक्षणच दिले जात असल्याने कल्याण डोंबिवली येथील विद्याार्थी आणि विविध पक्षातील नेत्यांकडून नाराजीचा सुर उमटत आहे. या उपकेंद्रात इतर विषयाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना गुणपत्रिका, अभ्यासक्रमासाठी अर्ज भरणे, शिष्यवृत्ती, रोजगार मार्गदर्शन सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. या उपकेंद्रात रूजु करण्यात येणारे शिक्षकही कायमस्वरूपी नसल्याने जे विद्याार्थी पीएचडीचा अभ्यास पूर्ण करत आहेत त्यांची पीएचडी पूर्ण होईपर्यंत तरी हे शिक्षक विद्यापिठात राहतील का असा सवालही तपासे यांनी पत्रकारांशी बोलताना उपस्थित केला. यावेळी महाराष्ट्र प्रदेश सचिव समिर वानखेडे , अल्पसंख्याक उपाध्यक्ष वसिम शेख,युवक अध्यक्ष प्रशांत नगरकर, प्र.मा.समन्वय समिर गुधाते, कल्याण- डोंबिवली प्रसार माध्यम प्रमुख निरंजन भोसले आदी पदाधिकारी उपस्थित होते. शिक्षकांना कायमस्वरूपी घ्यावे अशी मागणीही यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महेश तपासे यांनी केली आहे.यासदंर्भात मुंबई विद्याापिठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांना पक्षाच्या वतीने निवेदन देणार असल्याचेही तापसे यांनी सांगितले.
विद्यापीठाच्या कल्याण उपकेंद्रात इतर शाखांचे अभ्यासक्रम सुरु करा… राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांची मागणी …
July 18, 2019
40 Views
1 Min Read

-
Share This!