डोंबिवली :- ( शंकर जाधव ) कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या डोंबिवली पश्चिमेकडील ‘ह’प्रभाग क्षेत्र कार्यालयातील मालमत्ता कर विभाग हे रात्री 1 वाजता सुरू आल्याचा आरोप विरोधी पक्ष नेते प्रकाश भोईर यांनी केला आहे.हा विभाग रात्री सुरु आल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.मालमत्ता विभाग रात्रीच्या वेळी सुरू असणे खूप गंभीर असून कागदपत्रात फेरफार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
रात्री उशिरा मालमत्ता विभाग सुरू असल्याने यात काहीतरी गौडबंगाल असून कागदपत्रात फेरफार तर होत नाही ना असा आरोप विरोधी पक्ष नेते प्रकाश भोईर यांनी केला आहे.याबाबत भोईर यांना विचारले असता ते म्हणाले, रात्रीच्या वेळी मालमत्ता विभागातील कार्यालय सुरू असण्यामागे कोणाचा हात आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे.याची दाखल पालिका आयुक्त गोविंद बोडके यांनी घेतली पाहिजे.दरम्यान भोईर यांनी हा धक्कादायक प्रकार उजेडात आणला असला तरी हा प्रकार अनेक दिवसांपासून सूरु आल्याचे बोलले जात आहे.