गुन्हे वृत्त

बनावट पावत्यांच्या आधारे करोडोंचा महसूल बुडविणाऱ्या दहा जणांच्या टोळीला अटक ; ठाणे खंडणी विरोधी पथकाची कारवाई

ठाणे : थेट जिल्हाधिका-यांच्या बनावट सही शिक्क्यांसह गौण खनिजांसाठी लागणारे बनावट परवाने आणि त्यापोटी आकारण्यात येणा-या शुल्काचे बनावट पावती पुस्तक बनवून शासनाला करोडो रुपयांचा गंडा घालणा-या विक्की बिभीषण माळी (२५, रा. मानकोली, ता. भिवंडी, जि. ठाणे) याच्यासह दहा जणांच्या टोळीचा भंडाफोड केल्याची माहिती गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपायुक्त दीपक देवराज यांनी सोमवारी दिली. या टोळीकडून एक कोटी २८ लाख रुपये किंमतीची १५६ बनावट गौण खनिज परवाना पावती पुस्तके तसेच लॅपटॉप, मोबाईल फोन आणि पेन ड्राईव्ह असा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे.

ठाण्यात खाडीतून तसेच इतर ठिकाणाहून गौण खनिज उपसा करण्यासाठी जिल्हाधिकारी यांची परवानगी बंधनकारक आहे. त्यानुसार गौण खनिज उत्खनन करण्यासाठीचा परवाना आवश्यक असतो. काही ठराविक रक्कम भरल्यानंतर हा परवाना जिल्हाधिकारी कार्यालयातून अधिकृतरित्या दिला जातो. कळवा मुंब्रा परिसरात खाडीतून मोठया प्रमाणात गौण खनिज उपसा केला जात असल्याने याठिकाणी मोठया प्रमाणात खनिज परवान्यांची मागणी आहे. याचाच गैरफायदा घेऊन कळवा परिसरात गेल्या काही दिवसांपासून गौण खनिज वाहतूक परवाना तसेच बनावट पावती पुस्तके विक्री होत असून त्याच्या विक्रीसाठी एकजण येणार असल्याची टीप ठाणे खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा यांना मिळाली होती. त्याच माहितीच्या आधारे जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसिलदार मुकेश पाटील यांच्यासह कळव्यातील शिवाजी चौकात ११ जुलै रोजी सायंकाळी ७ वा. च्या सुमारास सापळा रचून माळी याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील गौण खनिज वाहतूक परवान्याचे दोन बनावट पावती पुस्तकेही जप्त करण्यात आली. याप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात तहसिलदार रेतीगट मुकेश पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरुन फसवणूक, अपहार, बनावट कागदपत्रे बनविणे अशा कलमांखाली गुन्हा दाखल केला. या प्रकरणात सहायक पोलीस आयुक्त निवृत्ती कदम यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा, पोलीस निरीक्षक राजकुमार कोथमिरे, संजय शिंदे, विकास घोडके, उपनिरीक्षक विलास कुटे, रोशन देवरे आणि रमेश कदम आदींच्या पथकाने सापळा लावून विक्की माळी याच्यासह अब्दुल खान (३५, रा. गोरेगाव, मुंबई) या दोघांना अटक केली. त्यांनीच दिलेल्या माहितीच्या आधारे बनावट गौण खनिज उत्खननाचे बनावट परवाने बनविणारी एक टोळीच यामध्ये कार्यरत असल्याची बाब समोर आली. त्यानंतर पोलिसांनी पद्माकर राणे (३९, विलेपार्ले, मुंबई), शाजी पून्नन (४५, अंधेरी पूर्व, मुंबई), अरविंद पेवेकर (३०, नालासोपारा), प्रशांत म्हात्रे (३३, वसई), धनसुख उर्फ लकी सुतार (३१, अंधेरी पूर्व, मुंबई), उमेश यादव (३४, अंधेरी, मुंबई) राजू पवार (३०, भिवंडी) आणि रवी जैस्वाल (४०, वाशी, नवी मुंबई) या टोळीला जेरबंद केले आहे.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

नवी मुंबई

error: Content is protected !!