ठाणे

कल्याण- डोंबिवलीतील कॉंग्रेस- राष्ट्रवादीचे नगरसेवक शिवसेनेच्या गळाला ?

डोंबिवली :- ( शंकर जाधव) महानगरपालिकेत काही वर्षापूर्वी राष्ट्रवादीची सत्ता होती. मात्र मोदी लाटेमुळे आता केंद्रात आणि राज्यात भाजप-शिवसेना सरकार विराजमान आहे. सत्तेचा मोह असल्याने कॉंग्रेस आणी राष्ट्रवादीतील अनेक नगरसेवकांनी भाजप आणि सेनेत प्रवेश केला. 2015 साली पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसचे चार तर राष्ट्रवादीचे दोन उमेदवार निवडून आले.आता हे सहा नगरसेवक आपल्या पक्षाचे काम व्यवस्थित करत असताना सहा नगरसेवक शिवसेनेच्या संपर्कात असल्याचे पत्रकारांना सांगितले. यात किती सत्यता हे लवकरच दिसून येईल.

डोंबिवलीतीलच नव्हे तर ठाणे जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेले माजी महापौर पुंडलीक म्हात्रे यांनी काही वर्षांपूर्वी राष्ट्रवादीचे घड्याळ काढून शिवबंधन हाती बांधले.त्यापाठोपाठ राजेश मोरे यांनीही राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत प्रवेश केला.आज राजेश मोरे यांना डोंबिवली शिवसेना शहरप्रमुख पदी काम पाहत आहेत.तर विकास म्हात्रे आणि रणजित जोशी यांनीही राष्ट्रवादी पक्षाला राम राम करत भाजव पक्षात प्रवेश केला होता.तर निलेश शिंदे यांनीही शिवसेनेत प्रवेश केला.त्यामुळे कल्याण- डोंबिवलीतील राष्ट्रवादी व काँग्रेस पक्ष दिसेल का असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला होता.मात्र पक्षाशी निष्ठा असलेले काँग्रेसचे चार तर राष्ट्रवादीचे दोन असे सहा नगरसेवक पक्षाची धुरा संभाळत आहेत.
सोमवारी ‘ग’प्रभाग क्षेत्र सभापती पदी शिवसेनेच्या नगरसेविका दीपाली पाटील यांनी पदभार स्वीकारला.यावेळी पाटील यांना कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी अभिनंदन केले.लांडगे यांनी पत्रकारांशी बोलताना आगामी विधानसभेबाबत युती होणार का असे पत्रकारांनी विचारले असता ,अजूनही युती तरी कायम असल्याचे सांगितले. तर राज्यात ज्याप्रमाणे शिवसेनेत इतर पक्षातील नेतेमंडळी प्रवेश करत असून कल्याण- डोंबिवली महानगरपालिकेतील काँग्रेस- राष्ट्रवादीचे नगरसेवक शिवसेनेच्या संपर्कात असल्याचे सांगितले.ज्या नगरसेवकांना शिवसेनेत प्रवेश करण्याची इच्छा असेल त्यांच्या आधी काय अपेक्षा आहेत याबद्दल चर्चा केली जाईल असे सांगत हे नगरसेवक शिवसेनेच्या संपर्कात आल्याचे सांगितले.

आमची पक्षासोबतची निष्ठा कायम राहणार–

यासंदर्भात काँग्रेस गटनेते नंदू म्हात्रे यांना संपर्क केला असता ते म्हणाले, काँग्रेसच्या नगरसेवकांची आपल्या पक्षावरील निष्ठा कायम आहे.माझ्यासह चार नगरसेवक काँग्रेससोबत कायम राहतील.

About the author

Aapale Shahar

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!