डोंबिवली :- ( शंकर जाधव ) कल्याण डोंबिवली सह आसपासच्या परिसरात मुसळधार पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावली असून दोन दिवसापूर्वी उद्भवलेल्या पूरग्रस्त परिस्थितीची नागरिकांनी चांगलीच धास्ती घेतली आहे .पावसाचा जोर कायम राहिल्यास पुन्हा पाणी साचण्याची शक्यता वर्तवली जात आहे .त्यातच काही समाजकंटकाकडून बारवी धरणाचे दरवाजे उघडल्याची अफवा पसरवली जात आहेत हा मेसेज सोशल मिडीयावर वेगाने व्हायरल होत असल्याने नागरिक चांगलेच धास्तावले आहेत सबंधित विभागाने मात्र सदर ची अफवा असून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन केले आहे
शुक्रवारी २६ जुलै रोजी सायंकाळपासून कल्यानं डोंबिवलीसह आसपासच्या परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावली .उल्हास नदीला पूर आल्याने बदलापूरसह कल्याण डोंबिवलीसहआसपासच्या ग्रामीन भागात अनेक सखल ठिकाणी सात ते आठ फूट पाणी साचले .रविवार पहाटेपासून पावसाने काहीशी उसंत घेतल्याने पाणी ओसरले होते त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला मात्र काल रात्री पासून पुन्हा एकदा पावसाने झोडपण्यास सुरुवात केली .त्यामुळे सखल भागात पाणीं साचण्यास सुरुवात झाली एकीकडे नागरिक या पाण्याने त्रस्त असतानाच बारवी धरणाचे काही दरवाजे उघडले असल्याची अफवा काही समाजकंटकांकडून पसरवली जात असून त्यामूळे लोकांमध्ये घबराट पसरली आहे.प्रत्यक्षात बारवी धरणात आज ६८. ८३ मीटर पर्यंत पाणी असून धरण ७० टक्के भरले आहे मात्र मागील वर्षी धरणाची उंची वाढवून धरणाला दरवाजे बसविन्यात आले होते मात्र धरण क्षेत्रात बाधित होणाऱ्या विस्थापिताचे पुनर्वसन करण्यात आलेले नव्हते परिणामी धरणाचे दरवाजे बंद न करताच ६८..६० मीटर वरून अतिरिक्त पाणी सोडून देण्यात आले होते मात्र यंदा बारवी धरणात नव्या उंचीनुसार ७२ मीटर पर्यंत पाणी भरले जाणार असून तदनंतर धरणाच्या बंधाऱ्यावर बसविण्यात आलेल्या ११ दरवाजातून एकाच वेळी अतिरिक्त पाण्याचा विसर्ग सुरू होईल मात्र सध्या धरणात केवळ ७० टक्के पाणी असल्यामुळे धरणातून पाणी सोडून देण्याऐवजी धरण पूर्णपणे भरण्यावर एमआयडीसीकडून लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. मात्र तरीही समाजकंटकाकडून धरणाचे दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आल्याच्या अफवा सोशल मीडियावरून पसरवल्या जात असून नागरिका मध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे यामुळे चुकीच्या अफवा पसरवून नागरिकांमध्ये भीती निर्माण न करण्याचे आवाहन एमआयडीसी प्रशासनाकडून करण्यात आले आहे.