ठाणे

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कोपर येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

डोंबिवली  :-  ( शंकर जाधव  )  शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कोपर येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार खा.डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला.  स्थायी समितीचे माजी सभापती तथा ज्येष्ठ नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी या सत्कार सोहळ्याचे आयोजन केले होते. या सत्कार समारंभासाठी व्यासपीठावर खा. डॉ. शिंदे, रमेश म्हात्रे, नगरसेविका गुलाब म्हात्रे, शिवसेना महिला संघटक पश्चिम विभागाच्या किरण मोंडकर, पूर्व विभाग संघटक मंगला सुळे,परिवहन माजी सभापती संजय पावशे, विभाप्रमुख किशोर मानकामे, अनंता म्हात्रे, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
       यंदाच्या दहावी बारावीच्या परिक्षेत अव्वल गुण प्राप्त करणाऱ्या कोपर परिसरातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना वह्या वाटप खा.डॉ. शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. शिंदे यांची वह्यांंनी तुला  करण्यात आली. यावेळी खा. डॉ.शिंदे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, कुठलेही शिक्षणक्षेत्र निवडले तरी प्रमाणिकपणे अभ्यास करत राहिले तर यश हमखास यश मिळते.महाराष्ट्रात कोपरचे नाव उज्वल करण्यात या विद्यार्थ्यांचे योगदान आहे.कोपर गाव येथील रमेश म्हात्रे यांचे फिक्स डिपाँझिट आहे.कारण शिवसेना  कोपर येथील जनतेच्या सुखदुखाशी एकरुप झाली आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसाला न जाता महालक्ष्मी एक्स्प्रेस मधल्या प्रवाशांची सुटका करण्यासाठी धावले.शिवसैनिकांना बाळासाहेबांची शिकवण आहे. संकटात पहिला धावून जाणारा शिवसैनिक असतो. पहिली अँबुलन्स शिवसेनेची असते.तर रमेश म्हात्रे म्हणाले की,  शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आमचा महाराष्ट्र भगवा महाराष्ट्र हि हाक दिली आहे. खा.डॉ. शिंदे यांनी वैद्यकीय शिक्षण घेउन सुध्दा समाज सेवेचा वसा घेतला.डॉ. शिंदे यांचा कामाचा अवाका मोठा आहे.त्यांनी कोपर येथे रेल्वे रुळ ओलांडण्यासाठी पादचारी पूल बांधला.गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये डॉ. श्रीकांत शिंदे यांचे गुण जावेत यासाठी त्यांची वह्यांनी तुला केली असल्याचे म्हात्रे म्हणाले. या सत्कार सोहळ्यात उरण येथील संजीवन म्हात्रे यांचा याल तर हसाल या कार्यक्रमाने उपस्थितांचे भरपूर मनोरंजन केले.सतीश नायकोडी यांनी भारदस्त आवाजात नीटके व मार्मिक सुत्रसंचालन केले.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

नवी मुंबई

error: Content is protected !!