ठाणे

जिल्हाधिकारी कार्यालयात महसुल दिन संपन्न

जिल्हाधिकारी कार्यालयात महसुल दिन संपन्न

ठाणे  : महसुल विभाग हा शासनाचा कणा असुन विभागातील अधिकारी,कर्मचारींनी लोकाभिमुख काम करणे  आवश्यक असल्याचे प्रतिपादन  जिल्हाधिकारी  राजेश नार्वेकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृह येथे आज महसूल दिन कार्यक्रमात ते बोलताना केले. महसूल विभाग हा शासनचा कणा असल्यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपली भूमिका कणखरपणे मांडून लोकाभिमुख काम करुन लोकांच्या जवळ जाणे अत्यंत महत्वाचे आहे.

शासनाचे नवनवीन उपक्रम येत असून हे उपक्रम योग्य रितीने राबविण्यासाठी प्रत्येकाने आपले कर्तव्य व जबाबदारी म्हणून काम केले पाहिजे. महसूल विभाग जनसामान्यांशी संबंधित विभाग आहे. त्यामुळे सर्वांनी लोकांच्या हितासाठी काम करावे अशा सूचना त्यांनी अधिकारी व कर्मचारी यांना दिल्या.अपत्ती व्यस्थापन विभागातुन कर्मचाऱ्यांनी महालक्ष्मी एक्सप्रेस मध्ये अडकलेल्या प्रवाशांना मदतीचा हात दिल्या बदल  सर्व शासकीय  यंत्रणाचे अभिनंदन केले.

यावेळी अपर उपजिल्हाधिकारी  अनिल पवार,उपजिल्हाधिकारी सामान्य प्रशासन अभिजित भांडे पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी अमोल खंडारे ,उपजिल्हा निवडणूक अधिकारी अपर्णा सोमानी तसेच महसुल विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!