ठाणे

डोंबिवलीतील तुषार सोनीच्या अपहरण आणि हत्येप्रकरणी राकेश लखारा आणि संतोष पडचित्तेला आजन्म कारावासाची शिक्षा.. ९ वर्षांनी लागला निकाल….

डोंबिवली :- दि. ०२ ( शंकर जाधव ) २ फेब्रुवारी २०१० रोजी डोंबिवलीतील १३ वर्षीय शाळकरी विद्यार्थी तुषार सोनी यांचे राकेश लखारा आणि संतोष पडचित्ते या दोघांनी अपहरण करून सुटकेसाठी ५ लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली होती.अपहरणकर्त्यांनी तुषारची हत्या केली. या गुन्ह्याच्या तपासात कल्याण क्राइम ब्रांचच्या पोलिसांनी राकेश आणि संतोषला अटक केली. कल्याण न्यायालयाने या खटल्यात भक्कम पुराव्याच्या आधारे आरोपींविरुद्ध पुरावा सिद्ध झाल्याने दोघांना आजन्म कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवलीतील ज्वेलर किरण सोनी यांचा १३ वर्षांचा मुलगा तुषार सोनी हा नेहमीप्रमाणे २ फेबुवारी रोजी दुपारी आदर्श विद्यामंदिर या शाळेत जात असताना त्याचे अपहरण झाले होते. त्याच्या सुटकेसाठी ५ लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली होती.कल्याण क्राइम ब्रांचच्या पोलिसांनी राकेश आणि संतोषला अटक केली. कल्याण कोर्टाकडून तपासासाठी १० फेबुवारीपर्यंत पोलीस कोठडी मिळाल्यावर त्याच्या चौकशीत या गुन्ह्यात साथ देणारे जॉय चौधरी (२८), संतोष देवेंद पडचिंते (२२) व किशोर रमेश शिंदे (२२) हे अन्य आरोपी पोलिसांच्या हाती लागले. खंडणीचे ५ लाख रुपये मिळाल्यावर राजेश लखारा त्यातील २ लाख रुपये स्वत:कडे ठेऊन किशोर व संतोषला प्रत्येकी ५० हजार आणि जॉयला २ लाख रुपये देणार होता, असे तपासात उघड झाल्याचे सह पोलीस आयुक्त प्रशांत बुरडे यांनी सांगितले होते. जिल्हा न्यायाधीश हातरोटे यांच्याकडे हि केस होती. या केसमध्ये सरकारपक्ष यांनी ३२ साक्षीदार तपासले. सदर भक्कम पुराव्याच्या आधारे आरोपींविरुद्ध पुरावा सिद्ध झाल्याने दोन्ही आरोपींना भादविकाक ३०२, ३६४ ( अ ) अन्वये आजन्म कारावास आणि प्रत्येकी १, ०५,००० रुपये द्रव्यदंड आणि द्रव्यदंड न भरल्यास ६ वर्ष ३ महिने सक्तमजुरी अशी शिक्षा सुनावण्यात आली. या केसमध्ये सरकारपक्षातर्फे सरकारी वकील राखी पांडे यांनी बाजू मांडली. या गुन्ह्यामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्ही. एम. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पैरवी अधिकारी , सहाय्यकफौजदार भगवान सूर्यवंशी यांनी कामकाज पहिले.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!