डोंबिवली :- ( शंकर जाधव) डोंबिवली पश्चिम मधील राजू नगर भागातील साई लीला चाळीतील दोन वर्षांची बालिका बेबी पियुष्या साहिल हिचे स्वाईन फ्ल्यूने निधन झाले. स्वाईन फ्ल्यूच्या आजाराचा हा पहिला बळी असून या पूर्वी डेंग्यूने २२ वर्षाच्या तरुणाचे निधन झाले होते. गेले काही दिवस बेबी तापाने आजारी होती तिला ताप आला होता.त्यातच तिचे निधन झाले. कल्याण डोंबिवली महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ.राजू लवांगरे यांना विचारले असता त्यांनीही याला दुजोरा दिला व सर्वेक्षण करण्यात आले असून मोठ्या बहिणीला पण डोस दिला असल्याचे त्यांनी सांगितले.
डोंबिवलीत स्वाईन फ्ल्यूने दोन वर्षाच्या बालिकेचा बळी
August 3, 2019
369 Views
1 Min Read

-
Share This!