ठाणे

मुसळधार पावसाने डोंबिवलीतील स्टेशनबाहेरील परिसर आणि एमआयडीसी परिसर जलमय…

डोंबिवली : ( शंकर  जाधव ) शुक्रवारी रात्री उशिरा सुरू झालेल्या मुसळधार पावसाने डोंबिवलीतील स्टेशनबाहेरील परिसर आणि एमआयडीसी परिसर जलमय झाले होते.शहरातील शाळांनी सुटया जाहीर केल्याने बच्चेकंपनीने पावसात भिजण्याचा आनंद घेतला.तर रेल्वे सेवेवर याचा परिमाण झाल्याने सकाळी मुंबईला कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांचे हाल झाले.डोंबिवली एमआयडीसीत मिलापनगर, सुदर्शन नगर मध्ये सतत पाऊसामुळे गेला आठवडाभर रस्त्यावर पाणी साचुन राहिल्याने नागरिकांना साचलेल्या पाण्यातून वाट काढत जावे लागले.नालेसफाई व्यवस्थित न झाल्याने नाले पावसाच्या पाण्याने भरले होते.त्यामुळे नाल्यातील पाणी रस्त्यावर आल्याचे दिसले. मिलापनगर तलावही भरून वाहत आहे. त्यामुळे त्यातील कचरा, निर्माल्य सर्वत्र पसरले आहे. अनेक ठिकाणी नाल्यातून पाणी पुढे जात नसल्याने त्या साचलेल्या पाण्यात मच्छर, कीटक यांची पैदास वाढली असून साथीचे आजाराचे प्रमाण दवाखान्यातील वाढलेल्या गर्दीमुळे लक्षात येते. याबाबतीत जनतेमध्येही उदासीनता असल्याने कोणतीच आवश्यक पावले प्रशासनाकडून उचलली जात नाहीत असे स्थानिक नागरिक राजू नलावडे यांनी सांगितले.

PHOTO GALLERY 

 

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

नवी मुंबई

error: Content is protected !!