डोंबिवली :- ( शंकर जाधव ) चार ते पाच दिवसांपासून अतिवृष्टी झाल्याने नागरिकांचे हाल झाले. यात चाळीतील घरांचे अतोनात नुकसान झाले होते. डोंबिवली पश्चिमेकडील देवीचा पाडा येथील दत्तात्रय कृष्णा भोईर चाळीतील दोन घरांच्या पाठीमागील भिंत कोसळली.ही घटना रविवारी सायंकाळी घडली. यामुळे घरातील कुटुंब घाबरले असून या घराच्या दुरुस्तीची गरज निर्माण झाली आहे. प्रकाश मुंणगेकर आणि गोविंद कोर्लेकर यांच्या घरातील भिंत कोसळली. या घटनेत सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. जवळपास १७ ते १८ वर्ष या चाळीतील हे दोन कुटुंबीय भाडे तत्वावर राहतात.या चाळीची जागा रेल्वे प्रकल्पात जात आहे.
अतिवृष्टीमुळे डोंबिवलीतील देवीच्या पाडा येथील चाळीतील भिंत कोसळली
August 5, 2019
108 Views
1 Min Read

-
Share This!