डोंबिवली :- ( शंकर जाधव ) केंद्र शासनाने जम्मू काश्मीर मधील ३७० कलम रद्द करण्याचा जो ऐतिहासिक निर्णय घेतला त्याबद्दल डोंबिवली शिवसेना मध्यवर्ती शाखेत जल्लोष साजरा करून पेढे वाटले.
कल्याण जिल्हा शिवसेना प्रमुख गोपाळ लांडगे, महापौर विनिता राणे, डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे, कल्याण ग्रामीण तालुका प्रमुख प्रकाश म्हात्रे, महिला पदाधिकारी कविता गावंड, किरण मोंडकर, स्मिता बाबर,मनीषा धुरी, माजी नगरसेवक तात्या माने, किशोर मानकामे, परिवहन समितीचे माजी सभापती संजय पावशे, अमित पाटील , स्वाती मोहिते, भावना चव्हाण, अनिता ठक्कर, माजी नगरसेविका सारीका चव्हाण आदींसह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. शिवसेना मध्यवर्ती शाखेच्य बाजूकडील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालण्यात आला.त्यानंतर इंदिरा चौकात युती सरकार बद्दल घोषणबाजी केली.