ठाणे

आजदेगाव आणि आजदेपाड्याचा पाणी प्रश्न सुटणार.. राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी घेतली बैठक ..

डोंबिवली : ( शंकर जाधव)  डोंबिवली जवळील आजदेपाडा आणि आजदेगावात पाणी पुरवठा कमी दाबाने होत असल्याने दीड महिन्यांपासून येथील रहिवाशी त्रस्त झाले होते.मात्र आता आजदेपाडा आणि आजदेगावाची पाणी समस्या काही दिवसातच सुटणार आहे.मंगळवारी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांची एमआयडीसी डोंबिवली विभागातील कार्यालयात बैठक बोलावली होती.यावेळी एमआयडीसी अधिकारी आणि पालिका अधिकारी यांनी आजदेपाडा आणि आजदेगावाला नियोजन करून पाणी पुरवठा करण्याचे आश्वासन राज्यमंत्री चव्हाण यांनी दिले.
आजदेपाड्यात पालिका प्रशासन तर आजदेगावाला एमआयडीसी कडून पाणी पुरवठा होतो.मात्र दोन्ही भागला कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने नागरिक हैराण झाले होते.या समस्येवर राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी गांभीर्याने लक्ष दिले. मंगळवारी सकाळी एमआयडीसी डोंबिवली विभागातील कार्यालयात राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, स्थानिक नगरसेवक विनोद काळण,योगेश तळेकर एमआयडिसी कार्यकारी अभियंता ननावरे, पालिकेचे जलअभियंता राजीव पाठक यांच्यात यासंदर्भात बैठक पार पडली.यावेळी राज्यमंत्री चव्हाण यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना नागरिकांच्या समस्येबाबत जाणीव करून दिली.बैठकीत चरम नागरिकांचा पाणी प्रश्न सुटला पाहिजे अशी ठाम भूमिका राज्यमंत्री चव्हाण आणि स्थानिक नगरसेवक विनोद काळण यांनी यावेळी घेतली.चर्चेअंती उपस्थित अधिकाऱ्यांनी पालिका प्रशासन आणि एमआयडीसी हे दोन्ही आजदेगाव आणि आजदेपाडा यांना नियोजन करून योग्य आणि आवश्यक दाबाने पाणी पुरवठा करण्याचे आश्वासन दिले.त्यामुळे लवकरच आजदेगाव आणि आजदेपाडा टँकरमुक्त होणार आहे.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!