डोंबिवली : ( शंकर जाधव ) डोंबिवली मानपाडा सांगाव कृष्णा अपार्टमेंट मध्ये राहणारे अनिल धाडवे हे काल सकाळी राहत्या घराला कुलूप लावून बाहेर गेले होते. ही संधी साधत अज्ञात चोरट्याने काल दुपारच्या सुमारास त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करत घरातील सोन्याचे दागिने व रोकड लंपास केली .या प्रकरणी मानपाडा पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असून या तक्रारीनुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे.दुसरी घटना कल्याणात घडली आहे. कल्याण पश्चिम मुरबाड रोड सिंडिकेट येथील रितेश टॉवर येथे काम करणारा जीवन रावल हा वॉचमन या टॉवरच्या परिसरात असलेल्या पंपरूम मध्ये राहतो .मंगळवारी रात्री अज्ञात चोरट्याने या पंप हाऊस मध्ये घुसून तिथे असलेली सोन्याची चैन,भारतीय व नेपाळी चलनातील रोकड असा मिळून एकूण १८ हजार १११ रुप्यांचा मुद्देमाल लंपास केला .याप्रकरणी महात्मा फुले पोलीस स्थानकात दाखल तक्रारी नुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे .तिसरी घटना डोंबिवली येथे घडली आहे .डोंबवली पूर्वेकडील कचोरे ९० फिट रोड येथील साईलीला अपार्टमेंट मध्ये राहणारे देवाशीष आगरकर मंगळवारी रात्र घरी झोपले होते या दरम्यान पहाटेच्या सुमारास त्यांच्या खिडकी उघडी होती .ही संधी साधत अज्ञात चोरट्याने उघड्या खिडकिवाटे घरात घुसून घरातील लॅपटॉप ,हेडफोन व रोकड असा मिळून एकूण 32 हजरांचा मुद्देमाल लंपास केला .या प्रकरणी टिळक नगर पोलीस स्थानकात दाखल तक्रारी नुसार पोलिसानी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे.
कल्याण डोंबिवली मध्ये घरफोडीचे सत्र सुरू…..
August 8, 2019
45 Views
2 Min Read

-
Share This!