डोंबिवली ( शंकर जाधव) बुधवारी डोंबिवलीत पश्चिमेकडील स्टेशनजवळील गोडसे भवन या अतिधोकादायक इमारतीचा स्लॅबचे पीओपी भाग अंगावर पडून एक रहिवासी मृत पावला. आज गुरुवारी दुपारच्या सुमारास पुन्हा एकदा डोंबिवली पूर्वेकडील पार्वती निवास या अतिधोकादायक इमारतीतील गोकुळ हॉटेलचा स्लॅबचे पीओपी भाग कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने या घटनेत कोणीतीही जीवितहानी झाली नाही.पालिकेचे ‘फ’ प्रभाग क्षेत्र अधिकारी दिपक शिंदे यांनी तात्काळ सदर इमारतीची पाहणी केली. सायंकाळी या इमारतीतील रहिवाश्यांना बाहेर काढले.तर दुकाने बंद केली.
४२ वर्ष जुनी असलेली ह्या इमारतीला १ महिन्यापूर्वी अतिधोकादायक इमारत अशी नोटीस बजावल्याचे प्रभाग क्षेत्र अधिकारी दिपक शिंदे यांनी सांगितले.तळ अधिक तीन मजले असलेल्या या इमारतीत चार कुटुंब आणि तीन दुकाने होती.पालिकेने तात्काळ ही इमारती खाली केली असली तरी ही इमारत स्टेशनबाहेर असल्याने लवकरात लवकर इमारत जमीनदोस्त करावी अशी मागणी नागरिक करत आहेत.