ठाणे

पूरग्रस्तांकरिता मदत स्वीकारण्यासाठी ठाणे जिल्ह्यात कक्ष स्थापन

नागरिकांनी उत्स्फुर्तपणे मदत करण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे आवाहन

ठाणे :  दि. ३ ऑगस्ट २०१९ पासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे राज्यात अनेक ठिकाणी विशेषत: सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. या ठिकाणच्या बाधित लोकांचे स्थलांतर अन्य ठिकाणी करण्यात आले आहे. सदर पूरग्रस्तांसाठी इच्छुक देणगीदार/ मदत करू इच्छिणाऱ्या व्यक्ती/ संस्था/ संघटना यांच्याकडून मदत स्वीकारण्याकरिता ठाणे जिल्ह्यात नैसर्गिक आपत्ती मदत कक्ष स्थापन करण्यात आले आहेत.

मदत कक्ष, संबंधित अधिकारी आणि त्यांचे दूरध्वनी क्रमांक अनुक्रमे पुढीलप्रमाणे :

जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे- आपत्ती नियंत्रण कक्ष, पहिला मजला, जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे-४००६०१, नियंत्रण कक्ष- ०२२-२५३०१७४०, २५३८१८८६, श्रीमती अनिला जवंजाळ (जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी- ७३०४६७३१०५), आर.व्ही.तवटे (तहसीलदार सर्वसाधारण- ८४२२९४१२२२), विकास पाटील (तहसीलदार महसूल- ८१०८५३३३३२), डॉ.शिवाजी पाटील (निवासी उपजिल्हाधिकारी- ७०४५४४५५२२).

तहसीलदार, ठाणे- तहसीलदार कार्यालय ठाणे, ठाणे स्टेशन रोड, ठाणे (प.), कार्यालय दूरध्वनी-०२२-२५३३११६४, अधिक पाटील (तहसीलदार- ८२७५३७७४५१), वासूदेव पवार (नि.ना.त.- ७७०००१५९७६).

तहसीलदार कल्याण- दिवाणी न्यायालयासमोर, कल्याण-मुरबाड रोड, कल्याण (प.)- ०२५१-२३१५१२४, दिपक आकडे (तहसीलदार- ९९३०१००००१), अभिजित खोले (नि.ना.त.- ९८७०१९१९१९).

तहसीलदार भिवंडी- भिवंडी जुना जकात नाका, आग्रा रोड, भिवंडी, जि.ठाणे, ०२५२२-२५७३५३, शशिकांत गायकवाड (तहसीलदार-९१६७७७५५११), संदिप आवारी (नि.ना.त.- ७९७७३१४०३९).

तहसीलदार अंबरनाथ- नवीन प्रशासकीय इमारत, पहिला मजला, अंबरनाथ (प.), ता.अंबरनाथ, जि.ठाणे ०२५१-२६८८०००, जयराज देशमुख- (तहसीलदार- ९४०४३९५५२५), संभाजी शेलार- (नि.ना.त.- ९०९६०९१८४७).

तहसीलदार उल्हासनगर- गांधी रोड, उल्हासनगर-५, ता.उल्हासनगर, जि.ठाणे ०२५१-२५३०५६८ विजय वाकोडे (तहसीलदार- ९९६७२८८८४५), एस.व्ही.गवई (नि.ना.त.- ९७६६२५७९००).

तहसीलदार शहापूर- तहसीलदार कार्यालय, शहापूर, ता. शहापूर, जि.ठाणे ०२५२७-२७२०६८ रवींद्र बाविस्कर (तहसीलदार- ९८९२८७१४९३), श्रीमती कोमल ठाकूर (नि.ना.त.- ९७०२१७०३०३).

तहसीलदार मुरबाड- नवीन प्रशासकीय भवन, एमआयडीसी, मुरबाड, ता.मुरबाड, जि.ठाणे ०२५२४-२२२२२५ अमोल कदम (तहसीलदार- ९०२८८५६२३१), विकास गारूडकर (नि.ना.त.- ९०४९९२९९१४).

पूरग्रस्त लोकांना आवश्यक असणारे साहित्य उदा. ब्लँकेटस्, सतरंजी, लहान मुलांचे कपडे, साड्या, टॉवेल, महिलांसाठी किट (साडी, परकर, टॉवेल, सॅनेटरी नॅपकीन इ.), तसेच पुरूषांसाठी किट (टी शर्ट, बर्मुडा, स्वेटर इ.), लहान मुले व मुलींसाठी किट असे पोषाख स्वीकारले जातील. जुने कपडे स्वीकारले जाणार नाहीत. याबरोबरच टिकाऊ अन्न पदार्थ, दैनंदिन गरजेच्या वस्तू स्वीकारल्या जातील. तसेच रोख स्वरूपातील निधी किंवा धनादेश खाली नमूद केलेल्या खात्यामध्ये संबंधित देणगीदारांना बँकेमार्फत जमा करता येईल.

मुख्यमंत्री सहायता निधी (मुख्य खाते) खाते क्रमांक १०९७२४३३७५१, स्टेट बँक ऑफ इंडिया, मुंबई मुख्य शाखा, फोर्ट, मुंबई ४००००१ शाखा कोड- ००३००० आयएफएससी कोड- SBIN0000300.

तरी सदर पूरग्रस्तांसाठी नागरिकांनी उत्स्फुर्तपणे मदत करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी केले आहे.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

नवी मुंबई

error: Content is protected !!