डोंबिवली : अतिवृष्टीने डोंबिवलीतील अनेक चाळीत पाणी शिरल्याने मालमत्तेचे नुकसान झाले.पुराचे पाणी ओसरुन गेले असले तरी आरोग्य विषयक समस्या वाढू लागल्या आहेत. २६ जुलै २०१५ साली महापुरात पाच ते सात डोंबिवलीकर लेप्टोस्पायरोसिसच्या आजाराने मृत्युमुखी पावले होते. या पुरातहि या आजाराने तोंड वर काढू नये म्हणून वेळीच वैद्यकीय उपचार घेणे आवश्यक आहे.डोंबिवली पश्चिमेकडील जुनी डोंबिवली येथे भाजप युवा मोर्चा डोंबिवली पश्चिम मंडल सरचिटणीस कृष्णा पाटील यांनी मोफत पूरग्रस्तांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित केले होते. यावेळी डॉ. शीतल पाटील यांनी या पूरपरिस्थितीत नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी असे सांगितले.
भाजपच्या वतीने आयोजित केलेल्या या शिबिराचा अनेक पूरग्रस्तांनी लाभ घेतला.यावेळी भाजप युवा मोर्चा डोंबिवली पश्चिम मंडल सरचिटणीस कृष्णा पाटील, डोंबिवली पश्चिम मंडळ विभाग अध्यक्ष अविनाश पाटील, जुनी डोंबिवली प्रभाग अध्यक्ष हर्षद सुर्वे, प्रभाग अध्यक्ष सिद्धेश साळवी, युवा मोर्चा अध्यक्ष डोंबिवली पश्चिम पवन पाटील यश अरविंद कोचरेकर, श्रीकांत दुधवडकर, जगदीश कामाठे, सुभाष डोके,राधिका मोरे,गणेश निंबाळकर आदीसह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी शिबिरात मेहनत घेतली. यावेळी या शिबिराच्या आयोजनाविषयी पश्चिम मंडल भाजपचे सरचिटणीस कृष्णा पाटील म्हणाले कि, गेल्या आठवड्यात पडलेल्या जोरदार पावसाने जुन्या डोंबिवली परिसरात अत्यंत बिकट परिस्थिती झाली होती. राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पुनर्वसन करण्यात येत आहे. तत्पूर्वी साथीचे रोग पसरू नये म्हणून मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे. याबाबत डॉ.शीतल पाटील यांनी यांनी साथीच्या रोगाबाबत चिंता व्यक्त केली. डॉ. पाटील म्हणाल्या, आता गरज आहे ती साथीच्या रोगांना अटकाव करण्याची आहे. या पुरानंतर लेप्टोस्पायरिसीस आणि जुलाब या दोन रोगाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. लेप्टोसाठी सरकारी रुग्णालयात मिळणा-या ओषधांचे दोन डोस घेतल्यानंतर परिणाम जाणवतो.त्यामुळे या गोळ्या खायला कंटाळा करु नका.जुलाब टाळण्यासाठी पाणी उकळून प्या. कोणताही आजार अंगावर काढू नका.डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घ्या.