ठाणे

मनसे डोंबिवली महिला सेनेची मंगळागौर रद्द करून पुरग्रस्तांना सढळ हस्ते मदत…

 डोंबिवली शहराची दहिहंडी रद्द करून २,५१,०००/- नाधीची पुरग्रस्तांना मदत…..

डोंबिवली :  ( शंकर जाधव  ) कोल्हापुर-सांगली येथे आलेल्या महापुरातील पुरग्रस्तांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना डोंबिवली शहरातर्फे मदतीचा पहिला टप्पा सांगलीला रवाना झाला आहे.महाराष्ट्र नवनिर्माण सेना डोंबिवली महिला अध्यक्षा मंदा पाटील यांनी यावर्षी मंगळागौर रद्द करून पुरग्रस्तांना सढळ हस्ते मदत केल्याचे सांगितले.मनसे डोंबिवली शहराची दहिहंडी रद्द करत मनसे डोंबिवली करणार २,५१,०००/- नाधी सुद्धा पुरग्रस्तांना देण्यात येणार आहे. मनसेने डोंबिवलीकरांकडून मदत केलेल्या पहिल्या टप्प्यात गोडेतेलाचे डबे, साखर,तूरडाळ, गव्हाचे पीठ, महिलांचे कपडे, टॉवेल, शर्ट, लहान मुलांचे कपडे, पाणी बाटल्या,फरसाण, बिस्कीट पुडे, सैनिटारी पॅड,मॅगी,फिनेल बाटल्या,साबण, खराटे ,भांडी, दप्तर, तीन गोनी तांदूळ, दुध पावडरचे २५ पाकिटे आणि अजून काही आवश्यक वस्तू  पाठवल्या आहेत. पहिली फेरी आज रवाना झाली असुन पुढील फेरी १५ तारखेला कोल्हापुर कडे निघणार आहे.मनसे उपाध्यक्ष तथा डोंबिवली शहर अध्यक्ष राजेश कदम, विद्यार्थी सेना डोंबिवली अध्यक्ष सागर जेधे,महेश कदम,अजय शिंदे, किरण मांगले हे मदतीसाठी रवाना झाले आहेत.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

नवी मुंबई

error: Content is protected !!