डोंबिवली ( शंकर जाधव) : स्वातंत्र्य दिनी ईगल ब्रिगेड फाउंडेशनने डोंबिवलीतील अण्णा नगर, कोपर रोड येथील पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले.ईगल ब्रिगेड फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विश्वनाथ बिवलकर फाउंडेशनचे सदस्य समीर कांबळी, संजय गायकवाड, अनुप इनामदार, योगेश साबळे, अजिंक्य देशमुख, अशोक हेगिष्टे, चिराग ठक्कर, ओजस ठोंबरे, स्वप्नील महाजन, केतन राणे, मंदार लेले व इतर सदस्य यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.तसेच विष्णुनगर पोलिस ठाण्याचे अधिकारी , गोपनीय विभागातील पोलिस कर्मचारी व्ही. टी. जाधव , मानविंदे, कडू, तायडे , पठाण हेही यावेळी उपस्थित होते.
ईगल ब्रिगेड फाउंडेशन स्वातंत्र्य दिनी डोंबिवलीतील पूरग्रस्तांना मदत…
August 15, 2019
29 Views
1 Min Read

-
Share This!