ठाणे

कल्याणमध्ये नारळी पौर्णिमेच्या मिरवणुकीचा जल्लोष

डोंबिवली  : ( शंकर जाधव )  आगरी कोळी उत्कर्ष मंडळातर्फे संध्याकाळी नारळी पौर्णिमेनिमित्त शहरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. त्यात लाल टोप्या घालून सहभागी झालेल्या आगरी कोळीबांधवांनी पारंपरिक नृत्य सादर करून सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले.तसेच  मुरवणुकीमध्ये देखावा सादर केला त्यात भूमिपुत्रांला वाचवा देश वाचवा असे देखावा करण्यात आले होते  यावेळी महिलाही मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.शिवाजी चौकातून मिरवणुकीला सुरुवात झाली.
बैलगाडीवर सोनेरी नारळ सजवून ठेवला होता. प्रारंभी युवा गर्जना ढोलताशा पथकाने गजर करत जोरदार सलामी दिली. बैलांसह सजवलेल्या गाड्यांवर लहान मुले बसली होती. ‘सन आयलाय गो नारळी पुनवेचा’ या गाण्यावर आगरी कोळीबांधवांनी नृत्याचा ठेका धरला होता.शिवाजी चौकातून काढलेल्या या मिरवणुकीची सांगता दुर्गाडी खाडीजवळ झाली. यावेळी सोनेरी नारळ अर्पण केला.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

नवी मुंबई

error: Content is protected !!