डोंबिवली : – दि. १५ ( शंकर जाधव ) कल्याण मधील बालक मंदिर शाळेतील चिमुकल्या विद्यार्थिनीनी कल्याण मधील पत्रकारांना राख्या बांधून रक्षाबंधन सण साजरा केला.लोकशाहीचा चौथा स्थंभ म्हणून पत्रकारांना ओळखले जाते. बातमीसाठी धावपळ करताना अनेकदा पत्रकारांना आपल्या कुटुंबियांना वेळ देणे शक्य होत नाही, अनेक सणवार पत्रकार कुटुंबियांसोबत साजरे करू शकत नाहीत. त्यामुळे या पत्रकारांसोबत रक्षाबंधन साजरा करण्याची संकल्पना बालक मंदिर शाळेच्या मुख्याध्यापिका विद्या जोशी यांच्या मनात आली. त्यानुसार त्यांनी बुधवारी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या पत्रकार कक्षात आपल्या चिमुकल्या विद्यार्थिनीसोबत येऊन उपस्थित पत्रकारांना राख्या बांधल्या.बालवाडीच्या वर्गातील देवश्री डोंबे, दृष्टी भोईर, यज्ञेश्वरी बर्वे, ख़ुशी खारूक, स्वरा विसपुते, मानवी भंडारी, दुर्गा लोणये या सात विद्यार्थिनी यावेळी पत्रकारांना राखी बांधत होत्या. तर मुख्याध्यापिका विद्या जोशी आणि सह शिक्षिका अलका जडे या विद्यार्थिनीना मदत केली. अशा प्रकारे या विद्यार्थिनीनी राख्या बांधल्याने पत्रकार कक्षातील पत्रकार देखील भारावून गेले होते.
चिमुकल्यांनी बांधल्या पत्रकारांना राख्या..
August 15, 2019
28 Views
1 Min Read

-
Share This!