डोंबिवली : (शंकर जाधव ) कल्याण-शिळ मार्गावरील सोनारपाडा गावात असलेल्या संतोषी माता मंदिराजवळील ओशियाना प्लाझा इमारतीत इमारतीत राहणाऱ्या मोनिका शिवदास केणे ( १९ )या महाविद्यालयीन विद्यार्थीनीने राहत्या इमारतीच्या टेरेसवरून उडी मारून आत्महत्या केली. या संदर्भात अभिजीत केणे २९ याने दिलेल्या माहितीनुसार मानपाडा पोलिसांनी नोंद केली आहे. सदर इमारतीच्या पहिल्या मजल्यावर राहणारे ठाकूर यांनी अभिजित केणे यांना ही माहिती दिली. बुधवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास मोनिका हिने इमारतीच्या टेरेसवरून स्वतःला झोकून दिले. यात ती गंभीर स्वरूपात जखमी झाली. जमलेल्या नागरिकांनी रिक्षातून तिला जवळच्या नेपच्यून हॉस्पिटलमध्ये दाखल केले. प्रकृती चिंताजनक असल्याने तेथून तिला निवासी विभागातील ममता हॉस्पिटलमध्ये दाखल केले. डॉक्टरांनी प्रयत्नांची शर्थ केली. मात्र रात्री पावणेदहाच्या मोनिकाला मृत घोषित करण्यात आले. मोनिकाच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. मात्र तिच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
महाविद्यालयीन विद्यार्थीनीची इमारतीवरून उडी मारून आत्महत्या…. डोंबिवलीजवळील सोनारपाडा गावातील घटना…
August 15, 2019
956 Views
1 Min Read

-
Share This!