ठाणे

मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली ठाणे येथे आढावा बैठक संपन्न

ठाणे दि. 18 : विधान सभा निवडणूक 2019 तयारीचा भाग म्हणून राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंग यांच्या अध्यक्षतेखाली ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समिती सभागृह मध्ये आढावा बैठक पार पडली. या बैठकीला कोकण विभागीय आयुक्त शिवाजीराव दौंड, ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, निवासी उप जिल्हाधिकारी शिवाजी पाटील, निवडणूक उप जिल्हाधिकारी अपर्णा सोमाणी यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

प्रथम राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांनी इलेक्ट्रॉनिक मतदानयंत्र (EVM) गोदाम क्र.1 कोपरी येथे भेट देऊन निवडणूक मशिन संदर्भातील चाललेल्या कामकाजाची पाहणी केली. यावेळी त्यांनी कामात येणाऱ्या अडचणी समजून घेऊन काम वेळेत पुर्ण करण्याबाबत मार्गदर्शन केले.
समिती सभागृहामध्ये झालेल्या बैठकीमध्ये त्यांनी 2019 मध्ये नोंद झालेले दिव्यांग मतदार, त्यांना दिल्या जाणाऱ्या सुविधा, विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी प्रशिक्षण कार्यक्रम, नागरिकांकडून प्राप्त झालेल्या तक्रारीवर केलेल्या कार्यवाही, लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीच्यावेळी दाखल करण्यात आलेले गुन्हे निकाली काढण्यासंदर्भात केलेली कार्यवाही यासंदर्भातील आढावा घेतला. श्री. सिंग यांनी दुबार नोंदणी व मयत मतदारांची नावे मतदार यादीतून वगळणे, मतदारांमध्ये मतदान करण्याबाबत जागृती करणे आदी मुद्यांवरही चर्चा करुन मार्गदर्शन केले.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

नवी मुंबई

error: Content is protected !!