ठाणे दि २१ ऑगस्ट : जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची सेवा पुस्तिका ऑनलाईन करण्याची प्रक्रिया सुरु असून त्यासाठी आस्थापना विषयक बाबी हाताळणाऱ्या तालुका आणि मुख्यालय स्तरावरील कर्मचाऱ्यांना २० आणि २१ ऑगस्ट २०१९ रोजी यशवंतराव चव्हाण सभागृहात राष्ट्रीय माहिती केंद्र मानव संपदा केडर मॅनेजमेंट प्रणाली बाबत प्रशिक्षण देण्यात आले.
राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान २०१९-२० अंतर्गत सुरु असलेल्या या प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी ( पंचायत ) अशोक पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यामध्ये विविध विभागाच्या ३२ कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.
सेवेत रुजू झाल्यापासून सेवा समाप्ती पर्यंत सेवा कालावधीच्या संपूर्ण नोंदी अद्यावत करण्यासाठी शासनाने विहित करून दिलेल्या मानवसंपदा प्रणालीमध्ये ऑनलाईन पद्धतीने यापुढे संपूर्ण नोंदी केल्या जाणार आहेत. या ई-सेवापुस्तीकीचे कामकाज कसे करावे याबाबत पायाभूत प्रशिक्षण प्रशिक्षणार्थीना देण्यात आले. हे प्रशिक्षण सामान्य प्रशासन विभागाचे वरिष्ठ सहाय्यक पद्माकर राठोड यांनी दिले.