मुंबई : महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या राज्य संघटन सचिव पदी ठाणे जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी( पंचायत) अशोक पाटील यांची बिनविरोध निवड झाली. दि १७ व १८ आॅगस्ट २०१९ रोजी न्युझीलंड हाॅस्टेल, आरे काॅलनी मुबई येथे संपन्न झालेल्या अधिकारी महासंघाच्या त्रैवार्षिक अधिवेशनामध्ये सन 2019 ते 2022 या कालावधीसाठी पदाधिकार्याची निवड प्रक्रिया पार पडली. या सर्व निवडी बिनविरोध झाल्याचे महासंघाच्या प्रवक्त्यांनी सांगितले.
महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघामध्ये तब्बल 75 कॅडरचे सुमारे दीड लाख अधिकाऱ्यांचा समावेश आहे. महासंघाचे संस्थापक व मुख्य सल्लागार श्री ग दि कुलथे यांचे मार्गदर्शनाखाली महासंघाने अधिकारी व कर्मचारी यांच्या ७ वा वेतन आयोग व इतर अनेक जिव्हाळ्याच्या मागण्या शासनाकडून मान्य करून घेतलेल्या आहेत. अधिकारी, कर्मचारी यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी महासंघ सातत्याने शासनाकडे पाठपुरावा करीत असल्याचे श्री पाटील यांनी सांगितले.