ठाणे

पालिकेची भरपावसात शाळेवर कारवाई… आमदारांसह विद्यार्थ्यांच्या कडाडून विरोधानंतर पालिकेची माघार

कल्याण :- (  शंकर  जाधव  ) कल्याणमध्ये पुनर्वसन केल्याशिवाय दोन शाळांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या केडीएमसी अधिकाऱ्यांना आमदारांसह सर्व पक्षीय कार्यकर्त्यांसह शाळकरी विद्यार्थ्यांनि आधी पुनर्वसन करा मग कारवाई करा अशी मागणी करत  कडाडून विरोध केला या विरोधामुळे कारवाई करण्यास गेलेल्या महापालिका पथकाला माघारी परतावे लागले .
          कल्याण पूर्वेतील काटेमानवली हनुमान नगर परिसरात वेणूबाई पावशे हि मराठी शाळा आणि विश्वास विद्यालय हि इंग्रजी माध्यमाची  शाळा आहे.या शाळांमध्ये परिसरातील हजारो मुले शिक्षण घेत आहे.या दोन शाळाची इमारतिचे बांधकाम आणि काही मोबाईल टोवर अनधिकृत असल्याचे समोर आले असुन न्यायालयाने  अनधिकृत असलेल्या शाळेची इमारत आणि मोबाईल टोवरवर कारवाई करण्याचे आदेश कल्याण डोंबिवली महानगर पालिकेला दिले. आदेशानंतर पालिका प्रशासनाचे पथक कारवाई साठी त्या ठिकाणी पोहचले .यावेळी  स्थानिक आमदार गणपत गायकवाड सर्व पक्षीय लोकप्रतिनिधी कार्यकर्ते, शाळकरी विद्यार्थी आणि त्यांचे पालक यांनी शाळेसमोर गर्दी केली.यावेळी आमदारांसह विद्यार्थ्यांनी  आधी  पुनर्वसन करा आणि नंतर कारवाई करा अशी मागणी करत कारवाईस कडाडून विरोध केला. अखेर केडीएमसी अधिकाऱ्यांनी शाळेचे जोपर्यंत पुनर्वसन होत नाही तोपर्यंत कारवाई होणार नाही असे आश्वासन देत महापालिकेचे पथक परतले.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!