डोंबिवली :- ( शंकर जाधव ) ऐकेकाळी चिवडा,लाडू,पन्हे,कोकम सरबत,शेव आदि पारंपारिक मराठमोळ्या पदार्थाना मोठी मागणी होती.पण मॉल संस्कृति व फास्टफूड पदार्थांकडे तरुणाईचा ओढा वाढल्याने या पदार्थांची मागणी सुमारे २५ टक्के घटली आहे.
आजकाल लहानमुलांनाच नव्हे तर तरुणांनापण आपले पारंपारिक पदार्थ आवडेनासे झाले आहेत.त्यांना फॅन्सी पदार्थाची चटक लागली आहे.तरुण विवाहित जोडपी पण आपल्या मुलांना फास्टफूड पदार्थ देण्याला प्रधान्य देत आहेत.पूर्वी वरचे खाणं म्हणून लाडू,चिवडा,चकली असे पौष्टीक पदार्थ दिले जात पण आता पालकच असे पदार्थ देण्यास तयार नाहीत.पार्श्चात्यांचे वाढते आकर्षण याला जबाबदार असल्याचे दुकानदारांचे मत आहे.पूर्वी पूर्णान्न म्हणून नाचणी सत्व,थालीपिठ,असे पदार्थ केले जात पण आता मॅगी,ब्रेकोली,असे जंकफूड मुलांना देण्याला प्रधान्य देण्यात येत आहे.याशिवाय ऑनलाईन बुकिंगचा पण फटका बसलयाचे दुकानदार बोलत आहेत कारण नोंदणी केलेले पदार्थ घरपोच मिळतात व मॉलमध्ये असे पदार्थ ठेवले जात नाहीत.याला मुलांपेक्षा पालकच जबाबदार असल्याचे सांगण्यात येते. अलिकडे उपवासाच्या पदार्थांची मागणही कमी झाली आहे.पूर्वी पारंपारिक पदार्थ ठराविक दुकानतून मिळत सणाच्या काळात हे पदार्थ मोठया प्रमाणात विकले जात पण आता किराणा दुकानातपण चिवडा,चकली,लाडू असे पदार्थ मिळू लागल्याने ठराविक पदार्थ विकणारे दुकानदार त्रस्त झाले आहेत.तरुण पिढी डायेटच्या मागे लागली असल्याने तेलकट,तुपकट,गोड पदार्थ खाण्यास तरुण पिढी नकार देत आहे.आज तरुण पिढी ब्रॅन्डच्या मागे लागल्याचे येथील ‘ सुरस फुडसचे सुनील शेवडे यांनी सांगीतले. तरुण पिढी पारंपारिक पदार्थ खाण्यापेक्षा फास्ट फुड खाण्याकडे आकर्षित झाल्याने पारपारिक पदार्थ विक्री सुमारे २५ टक्के घटल्याचे शेवडे यांनी मान्य केले आपले पदार्थ पौष्टीक असतात. पण आज फास्टफूडला प्रधान्य मिळत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली यामुळे आता हे पदार्थ तयार करणारे कारागिर आहेत, त्याचेवर पण उपासमारीचे संकट ओढावले आहे.