ठाणे : बँक ऑफ इंडिया, नवी मुंबई, प्रादेशिक कार्यालयातर्फे लघु व मध्यम उद्योग संदर्भात मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले होते. सदर कार्यक्रमात नवी मुंबई झोन अंतर्गत 10 विविध शाखांचे ग्राहक उपस्थित होते. त्यामध्ये ग्राहकांना भारत सरकार आणि बँकेतर्फे राबविण्यात येणार्या विविध एमएसएमई योजनेबद्दल सविस्तर सादरीकरण एमएसई सिटी सेंटरचे सहाय्यक महाप्रबंधक जयप्रकाश व नवी मुंबई अंचलचे आंचलिक प्रबंधक विश्वजीत सिंह यांनी ग्राहकांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाच्या वेळी विविध शाखेचे प्रबंधक व ठाणे मुख्य शाखेचे सहाय्यक महाप्रबंधक लक्ष्मीनारायण साके उपस्थित होते. या कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता ठाणे शाखेचे सुबोध गायकवाड, विक्रम खराडे, अमोल खडसे आणि मार्केटींग मॅनेजर सहजानंद उपस्थित होते.
बँक ऑफ इंडियातर्फे लघु-मध्यम उद्योगांसाठी ग्राहकांना मार्गदर्शन
August 22, 2019
21 Views
1 Min Read

-
Share This!