ठाणे : रोटरी क्लब ऑफ ठाणे ग्रीन सिटी यांची घोडबंदर रोड, ठाणे(प.) येथील हॉटेल विहंग इनमध्ये ओसीव्ही वार्षिक सभा संपन्न झाली. यावेळी रोटरी क्लबने सुधागड प्रतिष्ठान या सेवाभावी संस्थेच्या कामाचे कौतूक केले.
सुधागड प्रतिष्ठान ठाणेचे उपाध्यक्ष सदाशिव (नाना) लखिमले यांचे मार्गदर्शनाखाली एक शिष्टमंडळ रोटरीचे डिस्ट्रीक्ट गव्हर्नर डॉ. मोहन चंदावरकर आणि रोटीच्या नवनिर्वाचित अध्यक्षा प्राची वैद्य यांची भेट घेतली. सुधागड प्रतिष्ठानने आजपर्यंत केलेल्या कामाचा आढावा घेण्यात आला. एकंदरीत कामाची रुपरेषा, आयोजन आणि फलश्रुती पाहून गव्हर्नरच नव्हे, तर अध्यक्षांसह त्यांचे सहकारी प्रभावित झाले. म्हणून ‘सुधागड प्रतिष्ठानचा ध्यास – ग्रामीण भागाचा विकास’ या थीमचे कौतूक केले. त्यांना शुभेच्छा दिल्या आणि भविष्यातही संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासनही दिले.
सामाजिक संस्थांनी समाजकार्य करताना कोणती काळजी घ्यावी, ज्या परिसरात काम करावयाचे आहे तेथील परिस्थितीचा अभ्यास करून आपल्या कार्याची दिशा ठरवावी, अशा प्रकारचे उपयुक्त मार्गदर्शन गव्हर्नरांनी आपल्या भाषणात केले.
रोटरीचे मागील सर्व माजी अध्यक्ष या ओसीव्ही वार्षिक सभेला उपस्थित होते. सुधागड प्रतिष्ठानतर्फे नाना लखिमले, राजेश बामणे, शिवाजी ठुले, राकेश जंगम, दत्ता यादव व विनायक शिंदे यांनी चर्चेत भाग घेतला.
रोटरी क्लबच्या वार्षिक बैठकीत सुधागड प्रतिष्ठानच्या सामाजिक कार्याचे कौतूक
