मुंबई दि २६ – गणेशोत्सवानिमित्त मुंबई – कोल्हापूर मार्गे कोकणात जाणा-या वाहनांना ३० ऑगस्ट ते १२ सप्टेंबर २०१९ पर्यंत टोल माफ करण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज दिली.
आज मंत्रालयात गणेशोत्सवापुर्वी ट्रॅफिक नियोजनासंदर्भात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंत्री पाटील यांनी सांगितले. या बैठकीस उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे, शोलय शिक्षण मंत्री आशिष शेलार, गृहनिर्माण राज्य मंत्री रविंद्र वायकर, गृह ग्रामीणचे राज्यमंत्री दिपक केसरकर, आमदार वैभव नाईक, रस्ते विभागाचे सचिव सी.पी.जोशी, सार्वजनिक बांधकाम ईमारत विभागाचे सचवि श्री सगणे आदीसह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
मंत्री पाटील म्हणाले, यावेळी पावसामुळे रस्त्यांची दुरावस्था झाली असली तरी, गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणा-या चाकरमान्यांना कोणताही त्रास सहन करावा लागू नये यासाठी, रस्ते सुस्थितीत करण्यात आले आहे. काही ठिकाणी किरकोळ काम सुरू असून, ते तात्काळ पुर्ण करण्यात येणार आहे. याचबरोबर मुंबई कोल्हापूर मार्गे जाणा-यांना टोल माफ करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर डायव्हर्जन बोर्ड, रोड स्ट्रीप्स, अपघात होऊ नये म्हणून सूचना करणारे बोर्ड, गावांची नावे, जंक्शन बोर्ड, रॅम्बलर पट्टी, गतीरोधक लावण्यात आले आहे. याचबरोबर रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग येथील १४३ किलो मीटरच्या रस्त्यांचे काँक्रीटीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. २०८ किमी चे रस्ते सुस्थितीत असून, १४.६० किमी च्या रस्त्यांचे काम सुरू असून, लवकरच पूर्ण करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. सायन-पनवेल, खारपाडा, इंदापूर, अशा विविध रस्तयांचे डांबरीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. असून, किरकोळ दुरूस्ती अनेक ठिकाणी सुरू आहे. तसेच सध्या पुलावरही दुरूस्तीचे काम सुरू असून, गणपतीपूर्वी सर्व रस्ते सुरळीत होणार असल्याची माहिती मंत्री पाटील यांनी यावेळी दिली.