ठाणे

धर्मवीर आनंद दिघेंच्या पुण्यतिथीनिमित्त गरीब 5000 महिलांना अन्नधान्य व कपडे वाटप

शिवसेना विभागप्रमुख दिलीप ओवळेकर यांचा अनोखा उपक्रम
ठाणे, दि. 27 ः ठाण्यातील शिवसेना घोडबंदर रोड विभाग क्र. 12 स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे यांच्या पुण्यतिथी निमिताने  हनुमान मंदिर ओवळा, घोडबंदर रोड ठाणे येथे कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना विभागप्रमुख दिलीप ओवळेकर यांच्यावतीने आदिवासी गरजू 5000 महिलांना ब्लँकेट, छत्री, टॉवेल व अन्नधान्य वाटप करण्यात आले.
स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे यांची समाजाशी जुळलेली नाळ आजही इतकी घट्ट आहे की त्यांचे कार्यकर्ते जिल्ह्याच्या कानाकोपर्‍यातील दीनदलित, गरीब – गरजू नागरिकांच्या सेवेसाठी झटत असतात. त्यातील एक दानशूर व्यक्तीमत्व घोडबंदर शिवसेना विभागप्रमुख दिलीप ओवळेकर यांनीदेखील स्वर्गीय आनंद दिघेंच्या पुण्यतिथीनिमित्त ओवळा प्रभागातील आदिवासी पाड्यातील गरीब गरजू 5000 महिलांना अन्नधान्य व कपडे वाटप केले.  या कार्यक्रमास ओवळा-माजिवडा मतदारसंघाचे आमदार प्रताप सरनाईक, शहरप्रमुख रमेश वैती, स्थानिक नगरसेवक सिद्धार्थ ओवळेकर,  नरेश मणेरा, साधना जोशी, शिवसेना उपविभागप्रमुख संजय राऊत, शाखाप्रमुख ज्ञानेश्वर पाटील, उपविभागप्रमुख चंद्राकांत भोईर, दिपक भोईर,  युवासेना सरचिटणीस नटेश पाटील, शाखाप्रमुख दिपक भोईर, महादेव राऊत, गायमुखचे दिपक पाटील, ज्ञानेश्वर पाटील, जेय रूड्डी आसार,  शिवसेना महिला आघाडी समिधा मोहिते, ठाणे जिल्हा उपविभाग संघटक रोहिणी ठाकुर, ओवळा विभाग संघटक रेश्मा ओवळेकर, ओवळा महिला विभाग शाखाप्रमुख हेमलता पाटील,  पार्वती भोईर, कविता भागर, सर्व शिवसैनिक पदाधिकारी महिला आघाडी युवासेना व सर्व पदाधिकारी कार्यक्रमास उपस्थित होते.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!