ठाणे

सक्षम नारी जनरल कामगार संघटनेच्या सक्षम नारी सेवाभावी संस्थेतर्फे मंगळागौर

डोंबिवली : ( शंकर जाधव  )  सक्षम नारी जनरल कामगार संघटना सक्षम नारी सेवाभावी संस्थेच्या वतीने कोपररोड येथील शिवसेना शाखेच्या बाजूकडील गावदेवी महिला मंडळ येथील मंगळागौरचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नगरसेविका गुलाब रमेश म्हात्रे, संस्थापिका स्वाती मोहिते, अपर्णा संजय पावशे, उपाध्यक्षा शीतल धुरी, सचिव शोभा सावंत, खजिनदार शिल्पा गुड्डद,गीतांजली पाटील, उपसचिव नीलम मांजरेकर, सदस्या साक्षी पाटील, सुवर्णा पडमुख, किशोरी आचरेकर, प्रिया विचारे, सरस्वती प्रधान, अनिता ठक्कर, तन्वी इंगळे, प्राजक्ता दळवी आदी उपस्थित होते. यावेळी परिवहन समितीचे माजी सभापती संजय पावशे यांनी उपस्थित संस्थेच्या महिलांना त्याच्या पायावर उभे राहण्यासाठी सल्ला दिला.

श्रावण महिन्यात महिलावर्ग वेळात-वेळ काढून मंगळागौरीच्या निमित्याने एकत्र येऊन नाच-गाण्याचा आनंद लुटतात. याबरोबर हिंदू संस्कृतीची जपणूक करण्याचा प्रयत्न केला जातो. कौटुंबिक कामासाठी सातत्याने व्यस्त असल्यामुळे मंगळागौरीच्या निमित्याने महिलांना घरापासून थोडा वेगळा वेळ खर्ची करता येतो. यामुळे जुन्या मैत्रिणींचा सहवास मिळतो. श्रावण महिन्यातील शेवटच्या मंगळवारी सक्षम नारी जनरल कामगार संघटनाच्या महिलांनी मंगळागौरी कार्यक्रमात धमाल केली. `खुर्ची का मिरची, जाशील कैशी, नाच ग घुमा.. अस म्हणत फेर धरला. महिलांनी उखाणे घेत `पिंगा ग पिंगा पोरी पिंगा`, गोफ विणू बाई गोफ विणू`, `किकीच पान बाई किकी`, इतकच नव्हे तर `नाच रे मोर`, `टप टप टप टपघोडा चाले`, अशी गाणी म्हटली. यावेळी सक्षम नारी जनरल कामगार संघटना सक्षम नारी सेवाभावी संस्थेच्या संस्थापिका स्वाती मोहिते म्हणाल्या, मंगळागौर म्हणजे अस्सल पारंपारिक खेळ. श्रावण महिन्यातील हा स्त्रियांचा सण. सौभाग्यवती स्त्रियांना आपल्या भावना, संवेदना, आकांक्षा व्यक्त करण्यासाठी हिंदू धर्मात काही सणांचे आयोजन करण्यात येते. त्यातीलच एक महत्वाचा सण म्हणजे मंगळागौर. मंगळागौर ही एक सौभाग्यदेवता आहे. आपल्या पतीच्या रक्षणासाठी, भल्यासाठी श्रावणातील मंगळावारी हे व्रत नित्यनियमाने ठेवतात. मंगळागौरीची पूजा म्हणजे उमा-शंकराची पूजा असते. आमच्या संस्थेच्यावतीने बचतगट सुरु आहे. या माध्यमातून महिला त्याच्या पायावर उभे राहण्यास मदत करतो. कार्यक्रमाचे निवेदन अनघा चोपडेकर आणि मंजू सोलंकी  यांनी केले.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!