डोंबिवली ( शंकर जाधव ) : ईगल ब्रिगेड फाउंडेशनने या वर्षी सर्व सार्वजनिक गणपती मंडळांना आवाहन केले होते की, आपल्या मंडळाच्या बाहेर जे पोलिस बांधव आपल्या सुरक्षेसाठी सतत पहारा देत उभे आहेत त्यांना एकदा तरी गणपतीच्या आरतीचा मान द्या. या अनुषंगाने डोंबिवली पश्चिमेकडील आनंदनगर रहिवासी मित्र मंडळाने या आवाहनाला अनुसरून मंडळाबाहेर बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या महिला पोलिसाला श्रीगणेशाच्या आरतीचा मान दिल्याचे संस्थापक अध्यक्ष विश्वनाथ बिवलकर यांनी सांगितले.
गणपती बाप्पाच्या आरतीचा मान पोलीस महिला कर्मचाऱ्याला
September 3, 2019
18 Views
1 Min Read

-
Share This!