दिवा : ( शंकर जाधव ) सुमित मित्र मंडळाच्या गणरायाची प्रतिष्ठापना मंडळाचे आधारस्तंभ आमदार सुभाष भोईर यांनी सहकुटुंब केली. गणेशोत्सवाच्या सुमित मित्र मंडळाचे हे दहावे वर्ष असून या वर्षी कंबोडिया मंदिराच्या शैलीतील देखावा साकारण्यात आला आहे. १२० फुटाचा भव्य सभामंडप उभारण्यात आला असून त्यामध्ये ३२ फुटाचा गेट आहे. गेट वरती देवतांच्या भव्य मूर्ती भक्तांचे लक्ष वेधून घेत आहेत. पुरातन शैलीच्या मंदिरामध्ये आकर्षक शिवलिंग, देव देवतांच्या मुर्त्या, दगडी खांब त्याच प्रमाणे ठीकठिकाणी पारंब्या सोडण्यात आल्या आहेत. देखाव्याकरीत झाडांचा देखील वापर करण्यात आला आहे. मंदिरामध्ये प्रवेश करताना प्राचीन गुहेमध्ये शिरल्याचा भास होतो व प्राचीन पुरातन मंदिराची रंग संगती व त्याला साजेशी नेत्रदीपक रोषणाई साकारण्यात आली आहे. मंदिरामध्ये शिरल्यानंतर समोरच आकर्षक शिवलिंग साकारण्यात आले व मंदिराच्या देखाव्याला साजेल अशा प्रकारे गणपती बाप्पाची सोनेरी रंगाची मूर्ती आकर्षक स्वरूपात प्रतिष्ठापित केली आहे.गतवर्षी शिवकालीन राजवाडा व सभामंडपाचा देखावा साकारण्यात आला होता. दरवर्षी वेगळ्या पद्धतीचा देखावा सुमित मित्र मंडळाच्या वतीने साकारण्यात येतो. यावर्षी सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक किरण अनिल भडेकर यांच्या संकल्पनेतून देखावा साकारण्यात आला आहे. चित्रपट श्रुष्टीतील कलाकार गेली पंधरा दिवस देखावा साकारत होते. दररोज ६० ते ७० कारागीर मेहनत घेत होते. त्यामुळे अतिशय आकर्षक पद्धतीने व भव्यदिव्य अशा पुरातन मंदिराचा देखावा असलेल्या सुमित मित्र मंडळाच्या गणरायाचे दर्शन घेण्याचे आवाहन युवासेना युवा अधिकारी सुमित सुभाष भोईर यांनी केले आहे.
दिव्यातील सुमित मित्र मंडळाच्या गणरायाची प्रतिष्ठापना…. पुरातन शैलीतील मंदिराचा देखावा
September 3, 2019
113 Views
1 Min Read

-
Share This!