ठाणे : नौपाडा पोलिस स्टेशन प्रॉपर्टी मिसिंग रजिस्टर नंबर 22 33 /20 19 यातील फिर्यादी सौ वसुधा देविदास बोरकर वय 42 वर्ष काम नोकरी राहणार 104 विला रॉयल हिरानंदानी इस्टेट घोडबंदर रोड ठाणे यातील महिला या आपल्या पतीसोबत होंडा सिटी गाडीतून घोडबंदर ते ठाणे तीन हात नाका येथे आल्यानंतर गाडीतून उतरत असताना त्यांनी त्यांचे गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र सोन्याची चैन व सोन्याची माळ असे सोन्याचे सुमारे 40 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने एका प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये ठेवून सदरची पिशवी मांडीवर ठेवली होती तीन हात नाका येथे कारमधून उतरत असताना सदरचे सोन्याचे दागिने कोठेतरी पडून गहाळ झाले. सदर बाबत नौपाडा पोलीस ठाण्यात प्रोपर्टी मिसिंग दाखल करून घेऊन तेथील विभागात बिग पेट्रोलिंग करणारे नौपाडा बीट मार्शल 1 वरील पोलीस नाईक 35 15 कल्पेश कदम व पोलीस शिपाई 66 24 भूपेश भामरे यांना पोलीस ठाण्याकडून फोनवरून माहिती दिली असता प्रॉपर्टी मिसिंग मधील खबर देणाऱ्या फिर्यादी यांनाघटनास्थळी भेट दिली. सदर घटनेची इतंभूत माहिती घेऊन व घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तीन हात नाका परिसरातील विक्री करणारे फुगे, फुगे वाले यांचेकडे कसोशीने चौकशी करून एका फुगेवाला इसमास विश्वासात घेऊन, प्रॉपर्टी मिसिंग मधील गहाळ झालेले एकूण 40 ग्रॅम वजनाचे किंमत सुमारे 1लाख 60 हजार रुपयाचे सोने प्रोपर्टी मिसिंग नोंद झाल्यापासून वरील नमूद पोलीस कर्मचारी यांनी 2 तासात हस्तगत केला. सदर हस्तगत केलेले सोने फिर्यादी यांना पोलीस ठाण्यात बोलावून, मा.वरिष्ठ पोलीस निरीक्षक- श्री अनिल मांगले सो यांचे समक्ष गहाळ झालेले 40 ग्रॅम वजनाचे, 160000 रुपये किमतीचे सोने फिर्यादी यांना परत केले आहे. सदर बाबत फिर्यादी यांनी नौपाडा पोलिस स्टेशनचे आभार मानले आहे.
सतर्क पोलिसांमुळे चार तोळ्याचे दागिने मिळाले.
September 3, 2019
52 Views
2 Min Read

-
Share This!