ठाणे

अचानक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने कर्करोगग्रस्त रुग्णांस आर्थिक मदत…

डोंबिवली : डोंबिवली पश्मिमेतील अचानक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदा २८व्या वर्षात पदार्पण केले आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाही मंडळाने सामाजिक उपक्रमाची परंपरा सुरु ठेवली आहे. डोंबिवलीतील वैशाली देवरे या कर्करोगग्रस्त रुग्णांस आर्थिक मदत केली.डोंबिवली पश्मिमेतील महात्मा गांधी रस्त्यावरील गणेशोत्सव मंडळाच्या मंडपात रविवारी वैशाली देवरे यांना धनादेश देण्यात आला. यावेळी अचानक मित्र मंडळाचे अध्यक्ष सुजीत महाजन उपाध्यक्ष सतिश सोनवणे, श्रीकांत बिरमोळे, संतोष भोईर, सतिश मिश्रा, निखिल शेलार, राकेश धोपट इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
     याबाबत सुजीत महाजन म्हणाले कि, फक्त गणेश उत्सव साजरा करणे हा मंडळाचा उद्देश नाही. सामाजिक बांधिलकी जपत सामाजिक उपक्रम राबविणे हा मंडळाचा हेतू आहे.यंदा आमच्या मंडळाचे २८ वे वर्ष आहे.वैशाली देवरे ताई आम्हाला भेटल्या.त्यांनी त्यांची अडचण सांगितली.त्यानंतर मंडळाच्या कार्यकर्त्यांशी चर्चा केली.मंडळाच्या कार्यकर्त्यांनी ताईंना मदत करण्याचा निर्णय घेतला. आज यथाशक्तीने मंडळाच्या वतीने त्यांना आर्थिक मदत करण्यात आली आहे. या मदतीविषयी कृतज्ञता  व्यक्त करताना वैशालीताई म्हणल्या की, माझी आर्थिक स्थिती बिकट असल्याने या रोगावरील खर्च मला झेपणार नाही. उपचाराची रक्कम गोळा करण्यासाठी मी अनेक ठिकाणी फिरले. मला योग्य प्रतिसाद मिळाला नाही. दरम्यान, अचानक मित्र मंडळाचे सुजीत महाजन यांची ओळख कार्यकर्त्यांमुळे झाली. त्यांनी माझ्या परिस्थितीचा  विचार करुन मला मदत देऊ केली आहे. मला ज्या पध्दतीने मदत केली तशीच मदत इतर रुग्णांना मंडळाने द्यावी हि गणपती चरणी प्रार्थना. हरिश देवरे, अनिल गायकवाड, यतिश बांदोडकर, आदर्श सिंग, निलेश म्हात्रे, बाळू चव्हाण, संदीप सतनाक, मारुती नाईक, भरत धनके, अजित म्हात्रे. हे मंडळाचे सदस्य यासमयी उपस्थित होते.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

नवी मुंबई

error: Content is protected !!