ठाणे : खाऊसाठी दररोज मिळणारे पैसे व अनेक स्पर्धा मधुन बक्षिस मिळालेले पैसे न्यु गर्ल्स स्कुल व कनिष्ठ महाविद्यालय ठाणे येथे इयत्ता तिसरीत शिकणारी विद्यार्थीनी कार्तिकी किरणकुमार चव्हाण हिने कोल्हापूर येथील पुरग्रस्तांना 2000 हजार रुपयांची मदत केली.
कार्तिकीचे वडील किरण कुमार चव्हाण मराठी नाटय मंडळाने पुरग्रस्तांना जमा केलेल्या साहित्याची पॅकिंग करण्यासाठी गेले होते तेव्हा कार्तिकीच्या मनात आपण ही मदत करु शकतो हा विचार मनात आला व सतत न्युज चॅनेल वरील पुरग्रस्तांना मदतीच्या बातम्या पाहून मला मदत करावी वाटली असे तिने सांगितले.
जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांची भेट घेऊन मुख्यमंत्री सहायता निधीत पैसे जमा करण्यासाठी धनादेश तिने सुपुर्द केला. एवढ्या लहान वयात असे विचार मनात येणे हे कौतुकास्पद आहे असे म्हणून जिल्हाधिकारी यांनी तिचे कौतुक केले.