डोंबिवली : आज दुपारी दीडच्या सुमारास डोंबिवली औद्योगिक विभागातील पेरोक्सी केमिकल कंपनीत रासायनिक प्रक्रिया करणाऱ्या रिएकटर मध्ये अचानक स्फोट झाल्याने कामगारांमध्ये घबराट उडाली व ते पळत सुटले तेथे काम करत असलेल्या सचिन देशमुख (40)हा कामगार अंगावर तेल उडाल्याने गंभीर जखमी झाला असून खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे
दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास कंपनीतून मोठा स्फोट झाला व आग लागल्याने कंपनीतील व शेजारच्या कंपनीतील कामगार घाबरून पळत सुटले यामुळे परिसरात घबराट निर्माण झाली कंपनीत 4 कामगार काम करत होते त्यातील सचिन देशमुख रिएकटर मधील तेल अंगावर उडाल्याने भाजला त्याला तातडीनेरुग्णालयात नेण्यात आले
आगीचे वृत्त समजताच अग्निशमन दलाला बोलवण्यात आले कामा संघटनेचे अध्यक्ष देवेन सोनी व माजी अध्यक्ष श्रीकांत जोशी घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी मदत केली ही कंपनी यापूर्वी बदलापूर येथे होती व दोन तीन महिन्यांपूर्वी डोंबिवलीत सुरू करण्यात आली होती असे कामगार सांगतात रासायनिक प्रक्रिया करताना रिएकटर फाटला व आग लागली यामुळे आग लागली मात्र तातडीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आल्याने आग पसरली नाही खाडेकर हे कंपनीचे मालक असून त्याच्याशी संपर्क होऊ शकला नाही श्रीकांत जोशी यांनी रिएकटर फाटले व आग लागून स्फोट झाला असे सांगितले या पूर्वी 4 जुलै रोजी शारदा प्रोसेस कंपनीला आग लागली होती