ठाणे

तेलमिश्रीत पाउस पडतो हि अफवा आहे. – कामा, अध्यक्ष -देवेन सोनी

  डोंबिवली : डोंबिवलीतील कारखांन्यामुळे  तेलमिश्रीत पाउस पडल्याची अफवा पसरविण्यात आली होती.या बाबत
कल्याण अंबरनाथ   मँन्युफँक्चरिंग असोशिएसनचे (कामा) ने या संदर्भात एक बैठक घेतली.त्या बैठकीत कामाचे अध्यक्ष देवेन सोनी, उपाध्यक्ष एन पी टेकडे, कमल कपूर, सचिव राजू बैलुर, खजिनदार निखिल धुत व इतर पदाधिकारी उपस्थित होते.अफवा पसरविणा-या बातम्यांबाबत बैठकीत आक्षेप घेण्यात आला.
    अध्यक्ष देवेन सोनी म्हणाले की,   अश्या प्रकारच्या अफवा पसरवुन जनतेला भयभीत करण्यात येत आहे.२०१४ साली डोंबिवलीतील
फेज १ मध्ये पाउस पडल्याची चर्चा होती.परंतु शास्त्रीयरित्या यात तथ्यता  नाही.वाहनातून तेलाची गळती झाल्याने व त्यात पावसाचे मिसळ्यास पाण्याचा रंग बदलतो.कालच्या घटनेत , इंजिनिअरींग
कंपनी असल्याने शेडवरुन पडणारे पाणी तेलमिश्रीत असू शकते.परंतु प्रदूषणाच्या नावाने जनतेची दिशाभूल करण्याचे व भयभीत करण्याची माध्यमाची भूमिका चुकीची आहे.पत्रकारांनी वास्तवता मांडावी अफवा पसरवु नये.डोंबिवलीतील रासायनिक कारखानदार किंवा प्रोसेसिंग कंपन्या प्रदूषण नियंत्रण
बाबत अंत्यत सतर्क असतात.त्यामुळे डोंबिवली सीईटीपी – सांडपाणी प्रकल्पास राज्यपातळीवर वसंधरा पुरस्कार यंदा मिळाला आहे.डोंबिवलीतील
सर्व कारखानदारांकडून  प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या  निर्देशांची काटेकोर अंमलबजावणी केली जात आहे.
बातमी शास्त्रीय माहितनुसार द्यावी.हि माहिती आम्ही देउ शकतो. परंतु ब्रेकिंग न्युजच्या नावाखाली लोकांना भयभीत करु नये.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

नवी मुंबई

error: Content is protected !!