डोंबिवली : ( शंकर जाधव ) राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या प्रयत्नाने प्रभाग क्र.६९ शिवमार्केट ६० कोटी एमएमआरडीए करून उपलब्ध करून दिला आहे.या सर्व रस्त्यांच्या कॉंक्रीटीकरण करण्यात येणार असून यांचे भूमिपूजन राज्यमंत्री चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी नगरसेवक विश्वदीप पवार,कल्याण जिल्हा सरचिटणीस शशिकांत कांबळे, डोंबिवली पूर्व मंडळ अध्यक्ष संजीव बिडवाडकर,महिला अध्यक्षा पूनम पाटील, नगरसेवक मुकुंद पेंडणेकर, साई शेलार, सरचिटणीस रविसिंग ठाकूर,कामा संघटनेचे अध्यक्ष देवेन सोनी आदी मान्यवर उपस्थित होते. लोकमान्य टिळक चौकात भूमिपुजनाचा शुभारंभा करण्यात आला.
यावेळी राज्यमंत्री चव्हाण म्हणले कि, शिवमार्केट हा प्रभाग व्यवसायिक आणि शैक्षणिक संस्था, सांस्कृतिक वातावरणाने निर्माण झाला असून येथील रस्त्यांचे कॉंक्रीटीकरण होणे विकासाच्या दृष्टीकोनातून होणे गरजेचे आहे. येथील मध्यमवर्गीयांकडून चांगल्या रस्त्यांची सुविधा मिळावी हि अनेक वर्षापासूनची मागणी आहे.याची पूर्तता आता होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ४७१ कोटी रुपयांचा निधी डोंबिवलीतील कॉंक्रीटीकरण रस्त्यांसाठी उपलब्ध करून दिला आहे. या निधीसाठी सातत्याने मी पाठपुरावा केला होता. नगरसेवक विश्वदीप पवार यांच्या माध्यमातून निधी विकास कामांना आणि मुलभूत सुविधांना प्राध्यान्य देण्यात येत असून त्याचा लाभ प्रभागातील नागरिकांना होईल.नगरसेवक पवार यांच्या प्रभ्गातील गडकरी रोडच्या कॉंक्रीटीकरणाकोटी, टिळक चौक परिसर १९.३५, भगतसिंग रोड १०.१९ कोटी, आगरकर रोड ६.९१ कोटी आणि राज्रन्द्र प्रसाद रोड १९.३९ असे ६० कोटी रस्त्याच्या काँक्रीटीकरणासाठी खर्च करण्यात येणार असून अश्या मजबूत रस्त्यामुळे नागरिकांना मिळणार आहेत असे विश्वदीप पवार यांनी सांगितले. यावेळी मोठ्या प्रमाणात प्रभागातील नागरिक सहभागी झाले होते. यावेळी ज्येष्ठ नागरिकांनी श्रीफळ वाढवून कामांचा सुभारांभ केला. प्रदीप नवघरे, दादा कदम, आनंद देशपांडे, डॉ. पुराणिक, सुरेश पुराणिक, सुरेश पाठक, अशोक हळदिवे, वंदना गोडबोले,हेमलता संत, धरती गडा, बाळा मिस्त्री, जतीन गडा, हेमांशु जैन, वाघेला, भडसावळे,अक्षय पवार, सचिन बाबर, दिवेबाई आदी उपस्थित होते.