डोंबिवली : `आरोग्यदक्ष डोंबिवलीकर`ही मेडिक्लेम इन्शुरन्स योजना डोंबिवलीकरांसाठी सुरु होणार आहे. फक्त प्रती व्यक्ती वर्षाला ३५०० रुपये खर्च करावे लागणार असून यात वयोमानाची मर्यादा नाही अशी माहिती राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.डोंबिवलीतील एम्स हॉस्पिटलमध्ये ही आरोग्य विमा योजना सुरु होणार आहे. विशेष म्हणजे या योजनेत सर्व प्रकारचे आजार उपचारासाठी पात्र असणार आहे.सरकारची आयुष्यमान योजना गरीब कुटुंबासाठी असल्याने या योजनेचा लाभ मध्यमवर्गीय लोकांना मिळत नाही. `आरोग्यदक्ष डोंबिवलीकर`ही मेडिक्लेम इन्शुरन्स योजनेत मध्यमवर्गीयहि समाविष्ट असणार आहेत.हि योजना डोंबिवलीकरांसाठी जरी असली तरी इतर शहरातील मान्यवर व्यक्तींनी किंवा राजकीत व्यक्तींनी पुढाकर घेऊन आपल्या शहरात सुरु केल्यास याचा फायदा येथील नागरिकांना होईल असे राज्यमंत्री चव्हाण यांनी सांगितले. यावेळी एम्स हॉस्पिटलचे संचालक मिलिंद शिरोडकर उपस्थित होते.
‘आरोग्यदक्ष डोंबिवलीकर`ही मेडिक्लेम इन्शुरन्स योजना सुरु… वयोमानाची मर्यादा नाही…
September 10, 2019
236 Views
1 Min Read

-
Share This!