ठाणे

डोंबिवलीकर प्रवाश्याच्या तक्रारीची रेल्वे पोलिसांकडून टाळाटाळ… प्रामाणिक प्रवाश्याने केली बँग परत

डोंबिवली : डोंबिवलीतील एका प्रवाशाची डोंबिवली ते सीएसएमटी लोकल प्रवासादरम्यान आपली  बॅग विसरले होते.या प्रवाश्याने सीएसटी रेल्वे स्थानकातील रेल्वे पोलिसांकडे याबाबत सांगण्याचा देण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी टाळाटाळ केली.एका प्रामाणिक प्रवाश्याला हि बँग सापडल्याने त्यांनी ती बँग डोंबिवलीकर प्रवाश्याला परत केली.या घटनेमुळे रेल्वे पोलिसांच्या कामकाजाबद्दल नाराजी व्यक्त होत आहे.

डोंबिवली ते सीएसएमटी लोकलप्रवासादरम्यान डोंबिवलीकर संदीप अंभोरे हे दुपारच्या दरम्यान प्रवास करत असताना आपली महत्वाची कागदपत्रे आणि रोख तीन हजार रुपये असलेली बॅग लोकलमध्येच विसरले होते. मस्जीद बंदर स्टेशवर उतरल्यानंतर त्यांच्या बॅग विसरल्याचे लक्षात आले. त्यांनी तात्काळ लोकल पकडून सीएसएमटी स्टेशन गाठले. उभ्या असलेल्या दोन ते तीन ट्रेनच्या डब्यात शोध घेतला असता बॅग सापडली नाही. हरवलेल्या बॅगेचा शोध न लागल्यामुळे त्यांनी मात्र सीएसटी रेल्वे स्थानकातील रेल्वे पोलिसांना  स्टेशन प्रबंधकाच्या  कार्यालयाजवळ  बसलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याकडे हरवलेल्या बॅगेबाबत तक्रार दाखल करण्यासंबंधी विचारणा केली तेथील ऑनड्युटी पोलीस कर्मचाऱ्याने संदीप अंभोरे यांना उडवाउडवीची उत्तरे देत माहिती देण्यास टाळाटाळ केली. `या कार्यालयात जाऊन बघा , कोणी जमा केली असेल तर मिळेल, अन्यथा काहीही होणार नाही` असे सांगून आपली जबाबदारी झटकल्याचे अंभोरे यांनी सांगितले. स्टेशन प्रबंधकाच्या कार्यालयात चौकशी केली असता त्यांनी अशाप्रकारची बॅग कोणी जमा केली नसल्याचे सांगितले. कल्पेश काशिराम पवार यांनी बॅगेतून मोबाईल क्रमाक शोधून त्यांना बॅग सापडल्याचे सांगून बॅग परत केली. संदीप अंभोरे यांनी रोख रकमेसह कागदपत्रे असलेली बॅग परत मिळाल्यानंतर कल्पेश पवार यांचे आभार मानले. घडलेल्या घटनेबाबत अंभोरे यांना रेल्वे पोलिसांच्या कामकाजाचा अनुभव आल्याने त्यानी नाराजी व्यक्त केली आहे.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

नवी मुंबई

error: Content is protected !!