गुन्हे वृत्त

वाढ़दिवस साजरा करण्यासाठी तरुणांनी घातला धाडसी दरोडा…

ठाणे :  ठाणे ब्रह्मांड येथे राहणाऱ्या थॉमस जॉर्ज कुट्टी  यांचा हॉस्पिटल्सना नर्सेस व वॉर्डबॉय पुरविण्याचा व्यवसाय आहे, त्यांचे कार्यालय विक्रोळी येथे आहे दिनांक 3/9/2019 रोजी कुट्टी रात्री 11 सव्वा अकराच्या सुमारास आपल्या ड्रॉयव्हर भाऊसाहेब  विष्णू खिल्लारे याच्या सह आय 20 कारने आपल्या कार्यालयातून ब्रह्मांड येथील घरी येत असताना सिनेवंडर मॉल कापूरबावडी येथे  आले असता एका व्हॅगनार कारमधून  आलेल्या आरोपींनी त्यांच्या गाडीच्या समोर आडवी घातली व आय 20 ची काच फोडून त्यांना  बंदुकीचा धाक दाखवून तोंडावर ठोश्याबुक्क्यांनी मारून जखमी केले व त्यांच्या कडील 2 लाख रुपये असलेली पिशवी जबरदस्तीने हिसकावून पळून गेले, या प्रकरणी कार ड्रायव्हर भाऊसाहेब विष्णू खिल्लारे यांनी चितळसर पोलीस स्टेशन तक्रार नोंदवली.
              या गुन्ह्याच गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे, सहाय्यक पोलीस आयुक्त पंकज शिरसाठ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र राठोड, पोलीस निरीक्षक श्रीकांत धरणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक डी. सी. केदार यांनी गुन्हे प्रकटीकरण पथक, वर्तक नगर पोलीस स्टेशनचे कर्मचाऱ्या सह गुन्ह्याचा अतिशय कौशल्यपणे तपास करून सहा आरोपींना अटक केली.
                  अभिमन्यू नरसू पाटील वय 23 व्यवसाय चालक, राहणार आझादनगर ठाणे, तौफिक दगडू शेख वय 21, विद्यार्थी राहणार भीमनगर वर्तकनगर, गणेश श्रीराम इंदुलकर वय 22 व्यवसाय माथाडी  राहणार लक्ष्मी चिरागनगर वर्तकनगर ठाणे, उत्कर्ष विनायक धुमाळ उर्फ लाडू वय 21 वर्षे व्यवसाय नोकरी राहणार आनंदनगर कोपरी ठाणे, गुरुनाथ बाळु चव्हाण वय 22 व्यवसाय गाड्या धुणे राहणार धर्माचा पाडा गॅलेक्सी जवळ ठाणे, राहुल देवेंद्र गुहेर उर्फ भाल वय 22  राहणार लक्ष्मी चिरागनगर ठाणे या सहा आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे, यातील दोन आरोपी फरार असून त्यांची नावे चेतन हनुमंत कांबळे राहणार आझाद नगर ठाणे, व रोशन राजू तेलंगे राहणार कोकणी पाडा ठाणे या दोघांना सुध्दा लवकरात लवकर पकडण्यात येणार असल्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त पंकज शिरसाठ यांनी  सांगितले.
                     या आठही आरोपींमध्ये यांचा मास्टरमाइंड अभिमन्यू नरसू पाटील हा आहे, हा गाडीवर ड्रॉयव्हरच काम करतो, गेली पाच वर्षे तो थॉमस कुट्टी यांच्या कडे ड्रॉयव्हरच काम करत होता, थॉमस कुट्टी यांचा हॉस्पिटल्सना नर्सेस आणि वार्डबॉय पुरविण्याचा व्यवसाय असल्याने त्यांनी बऱ्याच हॉस्पिटल्सना वार्ड बॉय व नर्सेस पुरविल्या आहेत, त्या बद्दल ते आपलं कमिशन म्हणून पगारातले बारा टक्के  घेतात, व याची इत्यंभूत माहीती अभिमन्यू पाटील याला होती.
                  महिन्याच्या एक, दोन आणि तीन तारखेला ही रक्कम त्यांच्या कडे येते हे ही  त्याला माहीती होती, त्याने कुट्टी   ची नोकरी कधीच सोडली होती पण त्याच्या डोक्यात ही माहिती पक्की बसली होती एकदोन तीन तारखेला कुट्टी कडे पैसे असतात, या आरोपींपैकी अभिमन्यू पाटील आणि गणेश इंदुलकर हे पहिल्यापासूनच गुन्हेगारी प्रवृत्तीचे होते अभिमन्यू वर कापूरबावडी पोलीस स्टेशन मध्ये 307 चा गुन्हा दाखल आहे, तर गणेश इंदुलकर याच्यावर मुलुंड येथे 395 चा गुन्हा दाखल आहे.
                त्यातच अभिमन्यू नरसू पाटील याचा 24 सप्टेंबरला वाढदिवस आहे तो साजरा करण्यासाठी पैशाची गरज होती, तर गणेश इंदुलकर याला 395 ऍंटीसिपेटेड बेल करण्यासाठी पैसे हवे होते, त्या प्रमाणे झटपट पैसे कसे मिळतील याचा प्लॅन अभिमन्यू पाटील याने तयार केला वरील सगळ्या मुलांना त्याने तयार केले आणि थॉमस जॉर्ज कुट्टीवर दरोडा टाकण्याचे ठरविले, त्या साठी गाडी लागणार म्हणून त्याने भिवंडी येथील मित्राची  व्हॅगेनर गाडी घेतली त्याची नंबर प्लेट काढली, गुरुनाथ बाळु  चव्हाण व रोशन राजू तेलंगे यांना कुठल्याही मित्राची टुव्हीलर घेण्यास सांगितले त्या प्रमाणे त्यांनी मित्राला खोटच सांगून डिओ घेतली त्यांना थॉमस जॉर्ज कुट्टी विक्रोळीच्या ऑफिस मधून निघाले की त्यांचा पाठलाग करत ठाण्या पर्यंत यायचे व त्याची माहीती फोनवरून देत राहण्याचे काम दिले, त्याने सांगितल्या प्रमाणे प्लॅन तयार झाला, तीन तारखेला रात्री हे दोघे थॉमस कुट्टीच्या गाडीचा पाठलाग करत ठाण्यापर्यंत आले, सिनेवंडरच्या इथे आल्यानंतर गाडीतल्या आरोपींनी आय 20 च्या समोर गाडी घालून त्यांच्या जवळची पैशाची पिशवी घेऊन पळून गेले,
                  पोलिसांनी अभिमन्यू पाटीलला पकडल्या नंतर त्याच्या कडून गुन्ह्यात वापरलेली सफेद रंगाची व्हॅगनार किंमत 3, 50, 000/- रुपये रोख रक्कम 50, 000/-, आरोपी गणेश इंदुलकर याचे कडे पिस्तूल किंमत 25, 000/- रुपये, 100/- रुपये किमतीचे जिवंत काडतूस, रोख रक्कम 50, 000/- रुपये, आरोपी तौफिक शेख याच्या कडून 40, 000/- रुपये असा एकूण 5 लाख 15 हजार 100 रुपयेचा माल हस्तगत केला आहे .

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

नवी मुंबई

error: Content is protected !!