डोंबिवली : खा. डॉ. श्रीकांत शिंदे आमच्यापेक्षा राजकारणात उशिरा आले. मात्र आमच्यापेक्षा नेतृत्वाबाबत ते फार पुढे निघून गेले. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या व्यक्तीमत्वाला पैलुंना आकार देण्याचे काम पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरात घडत आहे.छत्रपती शिवाजी महाराज यांना ज्याप्रमाणे राजमाता जिजाऊंं यांनी संस्कारक्षम शिकवण दिली तशी शिकवण खा. डॉ. शिंदे यांना मिळत असल्याने डॉ. श्रीकांत शिंदे यांचे नेतृत्व उज्वल भविष्याकडे वाटचाल करित असल्याचे स्थायी समितीचे माजी सभापती ज्येष्ठ नगरसेवक रमेश सुक-या म्हात्रे यांनी सांगितले
प्रभाग क्र.६५ येथील नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्या विशेष प्रयत्नांमुळे नगरसेवक निधीतून कोपर येथील सुक-या शिवा चौक ते कोपर दिवा वसई पूल या रस्त्याचा भूमीपूजन सोहळा शिवसेना खा.डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते उत्साहात पार पडला.माजी परिवहन सभापती संजय पावशे, शिवसेना उपशहरप्रमुख किशोर मानकामे, संतोष चव्हाण, विवेक खामकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते. यावेळी रमेश म्हात्रे यांनी सांगितले कि, कोपर गावाच्या अंतर्गत उद्यान, तरण तलाव आणि मैदान या पायाभुत् सुविधा होण्याची गरज असून ती विकास कामे पूर्णत्वास नेण्यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि रेल्वे बोर्डाच्या समितीवर खासदार डॉ. शिंदे सदस्य असल्याने त्यांनी या विषयाकडे लक्ष द्यावे अशी मागणीही त्यांनी केली. कोपर गावातील २०० एकर जमीन सीआरझेड अंतर्गत नोंद झालेली आहे. या जागेची बाजार मूल्य सुमारे २ हजार कोटी आहे. या जागेचा विकास झाला तर तरुणांसाठी रोजगाराची मोठी संधी आहे या गोष्टीत खासदार डॉ. शिंदे यांनी लक्ष घालावे अशी विनंती केली.
कोपरच्या प्रत्येक विकास कामांत रमेश म्हात्रे यांचा सिंव्हाचा वाटा आहे. त्यांच्या पाठपुराव्यामुळे अनेक विकास कामे झाली आहेत. कोपर स्टेशन चा होम प्लात्फोर्म तयार होत आहे. २०२० होम प्लात्फोर्म तयार होईल. कल्याण लोकसभा क्षेत्रात साडे तीन हजार कोटींची रेल्वे विषयक कामे शिवसेनेच्या माध्यमातून केली आहेत. येत्या पाच वर्षात उर्वरित कामे होतील. सेनच्या माध्यमांतून विकास कामे केली असून साडे तीन लाखांच्या माधाधीक्याने मी निवडून आलो. माझ्या मतदार संघात लोकांच्या खूप अपेक्षा आहेत त्या पूर्ण केल्या जात आहेत. पश्चिम कडील ५२ येथे गेल्या २५ वर्षात रेल्वे हद्दीतील रस्ते झाले नाह्वते ते आज तयार झाले आहेत. कोपर ते भोपर या रस्त्यासाठी 22 कोटींचा निधी केंद्रांकडून आणला आहे. त्याचे काम लवकरच सुरु होईल. रेल्वे प्रवाश्यांची वाढती संख्या लक्षात घेता येत्या एप्रिल अगोदर ५ वि ६ वि रेल्वे तयार होणार असल्याने ५० फेऱ्या वाढणार आहेते. दिवा येथील ठाकुर्ली पादचारी पुलाचे व पादचार व उड्डाण पूल काम सुरु आहे त्यामुळे नागरिक सुवीधा मध्ये भर पडणार आहे. येत्या काळात आत वातानुकूलित लोकल रेल्वे धावणार कोपर ब्रिज दुरुस्तीचे काम पावसाल्यानंर सूर होणार. ठाणे स्थानकांचा ज्या प्रमाणे विकास झाला तास डोंबिवली स्थानकाचा करण्याच मानस आहे त्याचा आरखड तयार करण्याच काम सुरु आहे. स्थानक लिफ्ट, सरकते जिने यांची वाढ होणार आहे. वाहतूक कोंडी मुक्त होण्यासाठी जल वाहतूक व्यवस्था होणार आल्याने . २७ गावांचा पाणी प्रश्न सुटण्यासाठी अमृत योजने माध्यमातून केंद्र शासनाकडून १५१ कोटी रुपयांचा निधी मिळाला असून त्यामुळे पाणी समस्या कायमची सुटणार आहे.