डोंबिवली : कल्याण- डोंबिवली मधील खड्डेमय रस्त्यावरून नागरिकांसह लोकप्रतिनिधी प्रशासनाला लक्ष करत असतानाच विविध कार्यक्रमानिमित्त कल्याण डोंबिवली मध्ये येणाऱ्या कलाकारांनी रस्त्याच्या दुर्दशेवरून टीकेची झोड उठवली आहे .पंडीत हृदयनाथ मंगेशकर यांनी डोंबिवलीतील रस्त्यांचा उद्धार करून अवघे काही दिवसही उलटले नाहीत तोच आता सुप्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांनीही रस्त्यांच्या दुर्दशेवरून शालजोडीतील टिका केली आहे.
रविवारी कल्याण पश्चिमेकडील आचार्य अत्रे रंगमंदिरात प्रशांत दामले ‘साखर खाल्लेला माणूस’ या नाटकाच्या प्रयोगासाठी आले होते. येताना कल्याणातील रस्त्यांमूळे त्यांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागले .अखेर दामले यांनी रस्त्यांच्या दुर्दशेबाबत फेसबुकच्या मध्यमातून आपल्या भावना व्यक्त कराव्या केल्या .‘कल्याणात नाट्यरसिक उत्तम आहेत मात्र कल्याणातील रस्ते थर्डक्लास’ असल्याची पोस्ट करीत प्रशांत दामले यांनी शासकीय यंत्रणांवर आगपाखड केली आहे. या आधी कार्यक्रमानिमित्त डोंबिवलित आलेल्या
पंडीत हृदयनाथ मंगेशकर यांनी वाहतूक कोंडी आणि खड्ड्यामुळे कार्यक्रमस्थळी पोचण्यास विलंब झाल्याने त्यांनी उघड नाराजी व्यक्त करताना ६० वर्षापूर्वीपेक्षा देखील यंदा येथील रस्त्याची भयानक परिस्थिती झाल्याचा त्रागा व्यक्त केला होता त्यापाठोपाठ आता प्रशांत दामले यांनी लाखो कल्याण डोंबिवलीकरांना रोज भोगाव्या लागणाऱ्या समस्येला पुन्हा एकदा वाचा फोडली. नटसम्राटाकडून अपमानित झाल्यानंतर तरी शासन प्रशासनाला जाग येणार का असा सवाल उपस्थित झाला आहे .याबाबत प्रशांत दामले यांच्याशी संपर्क साधला असता माझी पोस्ट हीच प्रतिक्रिया आहे,बोलण्याच्या पलीकडे गेलेले आहे सगळं इतकी वर्षे मी कल्याण मध्ये येतोय बऱ्याच वेळा हीच परिस्थिती असते .खड्डे पडू नये यासाठी काय केलं पाहिजे याचा कुणी विचार करत नाही ,नुसतं खड्डे बुजवणे सुरू आहे .कायमस्वरूपी उपाय उपाय योजना केली पाहिजे हेवी वाहतूक खूप आहे म्हणून रस्ते उखडतात फुटतात ही कारणे नाही रस्ता असा बनवा की रणगाडा ही गेला पाहिजे एकदाच बनवा पण छान बनवा सर्व ठिकाणी अशीच परिस्थिती आहे मात्र काल आधी पेक्ष्या ही जास्त खड्डे होते म्हणून पोस्ट करावी लागली असे सांगितले