अंबरनाथ : लोपेज फाऊंडेशन व सत्य साई प्लेटीनम हॉस्पिटल व डॉ. सतीश पुराणिक व डॉ. नीलम सिंग यांच्या संयुक्त विद्यमाने “मोफत आरोग्य चिकित्सा शिबीर” अंबरनाथ पूर्वेकडील मोहन पुरम हॉल, कानसई सेक्शन याठिकाणी आज करण्यात आलं होते. या कार्यक्रमाचे आयोजन लोपेज फाऊंडेशनचे प्रमुख जोसेफ लोपेज यांच्यासह त्यांच्या टीमने केले होते.
या शिबिरात मोफत ईसीजी तपासणी, मोफत रक्तदाब तपासणी, मोफत मधुमेह तपासणी, वयोवृद्ध व्यक्तींसाठी मोफत बोन डेनसिटी तपासणी आदी तपासण्या करण्यात आल्या असून ज्या नागरिकांना शस्त्रक्रिया करण्याची आवश्यकता आहे अशा नागरिकांना हॉस्पिमध्ये शस्त्रक्रिया करण्याकरिता पाठविण्यात आले, त्यात मोफत एनजीओग्राफी, एनजीओप्लास्टी, बायपास, किडनी स्टोन, हार्ट व्हॉल, फ्रॅक्चर, प्रोस्टेट आदी शस्त्रक्रिया यांचा समावेश असून या शिबिराला नागरिकांचा उत्स्फुर्द प्रतिसाद मिळाल्याची माहिती लोपेज फाऊंडेशनचे जोसेफ लोपेज यांनी दिली. हे शिबीर यशस्वी करण्याकरिता डॉ. सतीश पुराणिक, डॉ. गणेश राठोड, डॉ. अरुणा राठोड, डॉ. नीलम सिंग, डॉ. परमानंद भाटिया, डॉ. जिमी गुप्ता यांच्यासह लोपेज फाऊंडेशनचे जोसेफ लोपेज, ट्रेवर डिक्लास, मेघना नायर, सुरेश चव्हाण, दिव्या नांबियार, मृत्युंजय नंदी, लक्ष्मण शिंदे, स्वामी दोराए, केतन भागवत, फोरेबी यादव, प्रकाश तुलसानी आदींनी प्रयत्न केले.