डोंबिवली : डोंबिवली पूर्व पश्मिमेला जोडणारा कोपर पूल १५ तारखेपासून वाहतूकीसाठी बंद केल्याने आता या रस्त्याचा वापर नागरिक मुक्तपणे फिरण्यासाठी करत असून ज्येष्ठ नागरिक,महिला,तरुणाई यांचे ते आताविरंगुळ्याचे केंद्र होत आहे. मात्र पूर्वेतील कोपर पूल प्रवेश करण्याच्या तोंडावर गेली १५-२० वर्षे आ@टोमोबाईल्सची दुकाने असून वाहतूकच ठप्प झाल्याने आ@टोमोबाईल्स दुकानदारांचा व्यवसाय बंद पडला असून त्याचेवर उपासमारीचे संकट ओढावले आहे.
येथील आ@टोमोबाइल्स दुकानदारांना विचारले असता त्यांनी संगीतले की कोपर पूलाच्या तोडावर सुमारे १५ ते २० दुकाने आहेत.गाडयांचे पंक्चर काढणे,टायर बदलणे,रेडियम बसवणे,स्पेअरपार्ट विक्री ,कव्हर बेटरी अशी विविध आ@टोमोबाईल्सची दुकाने आहेत रोज वाहतूकीचा मोठा प्लो असल्याने वाहनांची कामे सतत येत होती,आम्हाला शांत बसायला वेळ मिळत नव्हता. मात्र आता रविवार पासून संपूर्ण वाहतूकच बंद केल्याने व्यवसाय सुमारे ७५ ते ८० टक्के थंडावला असल्याने दोन वेळचे पोट भरणे कठीण झाले असल्याचे दुकानदार सांगतात. तसेच याच ओळीत बिर्याणी हाऊस,पान टपरी,चहा टपरी अशीही दुकाने असून त्याचाही व्यवसाय अल्प झाल्याचे असेही दुकानदार सांगतात पूलाचे काम लवकर व्हावे अशी प्रर्थना करणे आमच्या हातात असल्याचे एका दुकानदाराने सांगितले.या पूलावर आता नागरिकांची वर्दळ वाढली असून ज्येष्ठ नागरिक,महिला तरुणाई पूलाचा वापर फिरण्यासाठी करु लागले आहेत,ऐरव्ही पूलावर चालणे अवघड होत असताना आता नागरिक मुक्तपणे फिरत असून तरुणाईचे ते आता फिरण्याचे भेटण्याचे केंद्र झाले आहे.