डोंबिवली : पत्ते खेळताना बोलवल्याने संतापलेल्या तरुणाने महिलेची हत्या केल्याची घटना घडली आहे .या प्रकरणी मानपाडा पोलीस स्थानकात बाळाराम दिवे विरोधात गुन्हा दाखल केला आहे .
डोंबिवली पूर्व मानपाडा दिवा रोड उसरघर गाव येथील चिंतामण पाटील यांच्या वीट भट्टीवरील खोलीत बाळाराम दिवे व यमुना नावाची महिला राहते . बाळाराम दिवे हा काल साडे दहा वाजण्याच्या सुमारास पत्ते खेळत होता. याच दरम्यान यमुना यांनी दिवेला बोलावले. त्यामुळे संतापलेल्या दिवे याने हातातील स्टीलच्या कड्याने तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीत गंभीर दुखापत झाल्याने तिचा मृत्यू झाला .या प्रकरणी चिंतामण पाटील यांनी मानपाडा पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी बाळाराम दिवे विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे.